बच्चुभाउ कडु याच्या आगमनाने आदिवासी समाज बांधव भारावला
हीवरी येथील आज आदिवासी समाजाचे कुलदैवत म्हणून हेडअंबा देवीची रहाड असल्याने भव्ययात्रा हि या ठिकाणी आयोजित केली जाते आज जणूकाही या समाजाची दिवाळी असल्याचे चित्र पहावयास मिळते या वेळी विवाहित होऊन गेलेल्या मुली आप्तस्वकिय व आजूबाजूच्या गावातील अनेक या वेळी दर्शनास गर्दी करतात याच शुभ प्रसंगी राज्याचे राज्य मंत्री अचानक या उत्साहात सहभागी होतात हा क्षण समाज बांधावान करीता अनपेक्षित आल्याने अनेकझन भारावून गेले केवळ १० मिनिटात जनतेशी संवाद साधला आणि विश्वस्तांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत १० मिंटाच्या भेटीत १० लाखाचे सभा मंडप ८ महिन्यात उभारण्यात येईल असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिल्याने हा आनंद गगनात मावेनासा झाला, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या प्रमाणे एक गरिबांचा,शेतकरी शेतमजूराचां खरा कैवारी असल्याने तळागाळातील लोकांपर्यंत झटत आलेलं एक वेक्तीमत्व असल्याचे प्रतावणेतून सांगण्यात आले त्याच्या सोबत प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन मिर्झापूरे,सचिन मानकर,अक्षय साठे,रवी राऊत,भूषण धांदे,शुभम कोहरे,अजय मानकर स्वरभ वाघाडे विशाल चेके अक्षय कुमरे अमोल कोहचाडे,विशाल बोरकर,गणेश मारबते,आशिष भोंडे,अजय धांदे, निलेश शहारे तर नामदेवराव मडावी ओंकार कुमरे,आनंदराव मडावी,वसंतराव कोहचाडे, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
