तालुका प्रतिनिधी सय्यद अक्रम
आर्णी,आमणी ते आसरा रोडची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष
आर्णी:- आर्णी वरुन सात किमी अंतरावर आसरा हे गाव असुन या गावाला कोणतेही बस व्यवस्था नसल्याने या मार्गावरील नागरीक विद्यार्थी यांना आटो, दुचाकी वरुन प्रवास करावा लागत असल्याने त्यात सदर रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने आदळ आपट करुन गाव गाठावे लागते या रोड दुरुस्ती करीता अनेक तक्रारी करुन सुध्दा प्रशासनाने कोणतेही लक्ष दिले नसल्याने गेल्या दोन वर्षापासुन रस्त्याची अत्यंत दैनिय अवस्था झाली आहे हाच मार्ग 2009 मध्ये आरणी विठोली मार्गे ईचोरा 14 किलोमीटर पंतप्रधान योजनेतून मंजूर झाला होता आणि ते पूर्णही करण्यात आले होते काही काळानंतर हाच रस्ता आर्णी विठोली फाटा येरमल, ईचोरा मार्गे मुख्यमंत्री निधीतून करण्यात आला परंतु आरणी ते आसरा रस्ता आमनी मार्गेआजही अपूर्ण आहे या रस्त्याची अवस्था अत्यंत विखुरलेली आहे आसरा करांची या रस्त्यावरूनच नेहमी ये जा चालू असते तरीही प्रशासनाने ह्या मार्गाकडे लक्ष द्यावे . तेव्हा या भागातील जिल्हा परिषद सदस्य यांनी या रस्त्याकडे लक्ष केंद्रित करुन हा रस्ता मंजुर करुन या रस्त्यावरील नागरीकांना व विद्यार्थी यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे विशेष करून लोकप्रतिनिधींनी ह्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आसरा करांची मागणी होत आहे
