Home यवतमाळ गुरुदेव सेवा मंडळाने साजरी केली सावित्रीमाई फुले जयंती

गुरुदेव सेवा मंडळाने साजरी केली सावित्रीमाई फुले जयंती

34

गुरुदेव सेवा मंडळाने साजरी केली सावित्रीमाई फुले जयंती

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ (तरोडा ) ता.यवतमाळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने आद्य शिक्षिका , क्रांतीमा सावित्रीमाई ज्योतीराव फुले यांची १८८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हजारो वर्षांपासून स्त्री जातीची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ज्योतीरावांनी ओळखले आणि आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीमाईला शिक्षण देऊन ज्ञानदान करण्यासाठी उद्युक्त केले. सनातनी प्रवृत्तीने स्त्रियांना कर्मठ विचारांकडे वळवून आयुष्याची अवहेलना केली. स्त्रियांना पोथीनिष्ठ व कर्मकांडनिष्ठ बनविले त्यामुळे स्त्री जात मागे राहिली . सावित्रीमाच्या कृपेने आज स्त्रियांचा उद्धार झाला. असे प्रतिपादन डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी केले.
सुरूवात शिस्तप्रिय सामुदायिक प्रार्थनेमधून झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण प्रकाश अवझाडे व कोसल्या महल्ले यांनी केले.प्रियंका ढोके व प्रांजली डोंगरवार या दोन बालिकांनी सावित्रीमाईच्या वेशभूषेतून अभिभाषण करून जनतेला मोलाचा सल्ला दिला. या दोघींनी श्रोत्यांकडून वाहवा मिळविली.
ताराताई पोहोरकर, द्वारकामाई सोनोने, नंदाताई सोनटक्के, सुशिला ताई रणनवरे, कांताताई मोडले, राधाताई मोडले, विमलताई अवझाडे, बालाताई अवझाडे, कौसल्यामाई महल्ले, कमलताई अवझाडे, गहुकर्णाताई बावणे, बकूमाई सोनोने, ताराताई सोनोने, बहिणामाई कोडापे, शालूताई बनकर , लक्ष्मी ढोके यांच्यासह डॉ.माणिक मानकर, विठ्ठल कोडापे, ताराचंद चव्हाण, रामेश्वर गावंडे,संजय कांबळे ,ज्ञानेश्वर कोडापे, अरूण सोनटक्के, महादेव तुमडाम, दत्ता इंगळे, नारायण सूर्यकार, शंकर पोहोरकर, अवधूत गवळी, दिलीप मोडले, कनिराम जाधव, रूपेश चव्हाण, दीपक हारे, गणेश सोनोने, गिरीधर भगत, सुनील गिरपुंजे, विजय ढोके, प्रकाश अवझाडे, गणेश बनकर यांच्यासह गावातील बहुसंख्य स्त्री-पुरूष कार्यक्रमामध्ये सहभागी होते.
महिला भजन मंडळांनी अप्रतिम अशा भजनांचे सादरीकरण करून रसिकांच्या टाळ्या घेतल्या.
शेवटी राष्ट्रवंदना घेण्यात आली व अरूण सोनटक्के यांनी सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

Copyright ©