संपादक: सदानंद जाधव
एसटी महामंडळाची लालपरी बंद असल्याने प्रवाशांनसह विद्यार्थ्यांचे होत आहेत अतोनात हाल
एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या निष्क्रिय भूमिके मुळे कर्मचाऱ्याच्या आत्महत्या होत असल्यामुळे ४ नोव्हेंबर पासून दुखवटारुपी संप पुकारून न्याय हक्कासाठी विलिनीकरणाची मागणी रेटून धरली असून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लाल परी धावणे बंद झाली आहे. एसटी महामंडळाच्या लाल परीच्या थांबल्याने प्रवासी नागरिकांना हाल सोसावे लागत असून.खाजगी वाहतूक धारक चढ्या भावाने प्रवास भाडे वसूल करीत असून प्रमाणाबाहेर प्रवाश्यांना कोंबून ये-जा करीत आहे.नियमबाह्य प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनावर प्रशासना कडून कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नसल्याने खाजगी वाहतूक करणाऱ्यानी प्रवाशांनसह विध्यार्थ्यांची काळजी घेणे सोडून त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचे कार्य चालू केले असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे.ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येत असलेले विध्यार्थी लाल परी बंद असल्याने जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करीत आहे.शासनाने बस कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करून सर्वांची लाडकी लाल परी पुन्हा जोमाने सज्ज होऊन प्रवाश्यांच्या सेवेत यावी नागरिकांतून बोलल्या जात आहे
