Home यवतमाळ भांब (राजा) ग्राम पंचायत तर्फे दिव्यांगाना व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व साहितत्याचे...

भांब (राजा) ग्राम पंचायत तर्फे दिव्यांगाना व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व साहितत्याचे वाटप.

11

भांब (राजा) ग्राम पंचायत तर्फे दिव्यांगाना व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व साहितत्याचे वाटप.
———————————————
यवतमाळ- तालुक्यातील भांब (राजा) ग्राम पंचायती कडून १५ व्या वित्त आयोगातून गावातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्यांचा आधार म्हणून आर्थिक मदत व दैनदिन वापराच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रत्येक ग्राम पंचायतीला मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगातुन गावातील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व गरजावंत महिला यांना साहित्यासह आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. त्या उद्देशातूनच सरपंचा सौ. अनुप्रिया सुनिल डीवरे यांच्या पुढाकारात निर्णय घेवून दिव्यांगाना कर्णयंत्र, तीनचाकी सायकल, तर ज्येष्ठ नागरिकांना काठी व आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीने गावातील दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकात आनंद संचारले होते. या वाटपा दरम्यान गावच्या सरपंचा सौ. अनुप्रिया सुनिल डिवरे, उपसरपंच दत्ता उदेसिंग राठोड यांचे सह सदस्य सुनिल नारायण डिवरे, सुरेश रामदास बोंद्रे, ऋषीकेश ठाकरे, सौ. जयश्री अमृत जगताप, सौ. ज्योती ज्ञानेश्वर लांजेवार,सौ. मनिषा सचिन सोनवणे, सौ रेखा अरुण काकडे तथा भांब (राजा) येथिल गावकरी मंडळी उपस्थित होती.

Copyright ©