Home यवतमाळ शोतोकाॅन कराटे परीक्षेत 13 विद्यार्थ्यांना बेल्ट चे वाटप

शोतोकाॅन कराटे परीक्षेत 13 विद्यार्थ्यांना बेल्ट चे वाटप

33

शोतोकाॅन कराटे परीक्षेत 13 विद्यार्थ्यांना बेल्ट चे वाटप

शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ संलग्न शोतोकाॅन कराटे डो ऑर्गनायझेशन इंडिया द्वारे 28 ते 31 ऑक्टोबर 2021 ला प्रयासवन येथे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा शोतोकाॅन कराटे डो ऑर्गनायझेशन इंडियाचे
संस्थापक सिहान अतुल बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सेंसाई रोहित केवारकर, सेंसाई विनोद खोडकुंभे, सेम्पाई हेमंत गणेश उईके, सेम्पाई हितेश महानुर, सेम्पाई हिमांशू सरागे यांनी परीक्षा घेतली.
या परीक्षेमध्ये एकूण 13 विद्यार्थ्यांना आपले उत्कृष्ठ परिश्रम व मेहनत करून ही बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेमध्ये आलिया मोबीन चव्हाण, आदीबा मोबीन चव्हाण, संस्कार भालचंद्र माहुरे, वेदांत ललित गौरकार व हितेश राजेश वाघाडे हे विद्यार्थी येलो बेल्ट साठी पात्र ठरले, तसेच ऑरेंज बेल्ट साठी श्रवण निकेश कडूकार, ब्लू बेल्ट साठी ओम राहुल कडूकर व कु. आदिश्री मोहन तेलंग, पर्पल बेल्ट साठी पार्थ विनायक पजगाडे व कु.गौरी विनोद खोडकुंभे, तसेच ब्राऊन बेल्ट साठी भूषण मोरेश्वर जावळकर(3rd kyu) यश त्रुशब दरवेकर(2nd kyu), ओम उमेश चह्वाण(2nd kyu) हे विद्यार्थी पात्र ठरले.
तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून कु.आदीबा मोबीन चव्हाण ला जूनियर बेस्ट स्टुडंट्स अवार्ड व ओम उमेश चव्हाण सीनियर बेस्ट स्टुडंट्स अवार्ड देण्यात आला, तसेच यश कृषभ दरवेकरला बेस्ट इंस्ट्रक्टर अवार्ड देण्यात आला.
या विद्यार्थ्यांना रोहित केवारकर (सचिव – शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ), विनोद खोडकुंभे(सचिव कुडो असोसिएशन यवतमाळ) व रविन्द्र महानुर यांचे हस्ते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर 2021 रोजी प्रयासवन, यवतमाळ येथे प्रमाणपत्र व बेल्ट देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थियानी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक श्री. रोहित केवारकर, अजित मिश्रा, हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थ्यांचे कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), मनोज गुजरे(टेक्निकल डायरेक्ट कराटे असोसिएशन यवतमाळ), ओंकार चेके (जिल्हा अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीण पत्रकार संघ यवतमाळ), प्रवीण दिघाड़े(डायरेक्ट स्केटिंग व कराटे असोसिएशन यवतमाळ) व गणेश उईके यांनी केले.

Copyright ©