जिल्हा समन्वयक महिला आघाडी सौ सागर ताई पुरी यांची वैद्यकीय महाविद्यालयाला भेट
यवतमाळ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्री वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाला सौ सागर ताई अशोक पुरी यांनी आज भेट दिली. जिल्हा समन्वयक महिला आघाडी शिवसेना तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या सागर ताई पुरी सदस्य आहेत. त्यांनी आज शासकीय रुग्णालयाला भेट दिली….
रुग्णालयाला भेट देते वेळी त्यांनी रुग्णांची प्रत्यक्षपणे संवाद साधून त्यांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या , त्यांची मदत आपण कुठल्या प्रकारे करू शकतो हे सर्वप्रथम जाणून घेऊन ताईंनी त्यांच्या विषयी असलेली आपुलकीची भावनेने त्यांची विचारपूस केली . नातेवाईकांना भेटून त्यांच्याशी सुद्धा संवाद साधून ‘ तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल माझी गरज असल्यास मला संपर्क करा मी मदत करेल ‘या शब्दातून त्यांनी नातेवाईकांशी संवाद साधला .रुग्णांना व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही याची खात्री सागर ताई पुरी यांनी दिली .
रुग्णालयामध्ये असलेल्या औषधांचा साठा कमी होऊ नये , रुग्णालयामध्ये रुग्णांना औषधींचा तुटवडा पडणार नाही .. रुग्णवाहिका वेळेवर मिळावी यासाठी त्यांचा प्रत्यक्ष पुढाकार व त्या नेहमी प्रयत्नशील असतात.
