जिल्हा प्रतिनिधी
नाका पार्डि येथे समान न्याय कायदे विषयक फलकाचे अनावरण
23 ऑक्टोंबर 2021. रोजी ग्रामपंचायत नाकापार्डी येथे आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या तर्फे समान न्याय व कायदेविषक मोफत सहाय्य या फलकाचे अनावरण अँड. विजय गुप्ता व ग्रामसेवक नाकापार्डी यांच्या हस्ते करण्यात आले. या फलका मुळे गावातील जनतेस न्याय प्रक्रिये बाबत माहिती होऊन पीडितांना त्याचा लाभ मिळेल व सर्व सामान्यांनाही त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकेल त्या अनुषंगाने या फलकाचे अनावरण करण्यात आले
यावेळी ओमप्रकाश त्रिवेदी, राजकुमार भवरे, सुशीला राऊत, अंजनाबाई कुळसंगे, रोहित गुप्ता, संतोष दुबे, संतोष गुप्ता, विजय सोनवणे व नाका पार्डी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
