घरकुल वाटपात गैर प्रकार पात्र लाभार्थ्याना अपात्र,अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरविणाऱ्या वर कारवाई करा सरपंच दिनेश पवार,सुनील डीवरे
पात्र लाभार्थ्याना अपात्र,अपात्र लाभार्थ्यांना पात्र ठरविणाऱ्या वर कारवाई करा सरपंच सघटनेची मागणी दिनेश पवार,सुनील डीवरे यांनी केली आहे यवतमाळ तालुक्यातील संपूर्ण गावा मध्ये गरजू घरकुल लाभार्थ्यास डावलण्यात आले या मध्ये चुका करणारे दोषी असून त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे या मध्ये भांब ( राजा ) हिवरी,वाटखेड अर्जुना बोथ बोडण दिघोरी जांब नाका पारडी असे अनेक गावाचा समावेश आहे,विशेष म्हणजे वरूड या गावात आणि जांब येथे एकही घरकुल नाही तर भाब(राजा) येथे केवळ आठ लोकांनाचाच पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला या बाबत वेळी वेळी संबंधित विभागास पत्रही देण्यात आले मात्र या बाबत कुणीही दाखल घेतली नाही आणि चार काचा फोडल्या तर तातडीने दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले अधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था यवतमाळ तालुक्याची झाली आहे गेंड्याच्या कातडीचे झाल्याने कुणीही गाऱ्हाणे ऐकायल तयार नाही
पंत प्रधान योजने अंतर्गत घरकूल योजना आली आणि गोधळच सुरू झाला या योजनेमध्ये मध्ये तर ज्याचे घर पक्के अशाना पात्र आणि ज्याचे घर मातीचे व पडण्याची अवस्थेत आहे अशांना अपात्र ठरविण्यात आले हे अधिकारी किती विद्वान असेल या करून लक्षात येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे जावई शोध लावून गरजू लाभार्थ्यांना डावलण्याचे षडयंत्र केले हि बाब गंभीर असतानाही वरिष्ठ अधिकारी मुंग गिळून का बसले असा सवाल करण्यात येत आहे हा मोठा घरकूलघोटाळा असून भाब राजा या गावात ४५७ लाभार्थ्यांची यादी देण्यात आली या पैकी केवळ ८ घराणा मंजुरात देण्यात आली इतर १३ लाभार्थी अपात्र बाकी लाभार्थी गेले कुठे केवळ २१ नावे या गावात आहे का ? विशेष म्हणजे या प्रकरणी मागील वर्षा पासून सतत निवेदन द्वारे पाठपुरावा करणे सुरूच असतानाही हा प्रकार घडूंन येतो हि बाब गंभीर स्वरूपाची आहे तर जांब येथे एकही पात्र लाभार्थी नाही वरूड( ई ) या गावातील घरकुलच नसल्याने भोंगळ कारभार उजेडात आला आहे तर हिवरी येथे लाभार्थ्यांचे लाभ घेतल्यावरही पुन्हा नाव आले तर काहींचे घर सिमेंट चे आहे तरी त्यांचे नाव हा प्रकार गरजू लाभार्थ्यांवर झालेला अन्याय नाही का अन्याय ग्रस्त लाभार्थ्यांना न्याय मिळानार नाही तो पर्यंत आंदोलने करू वेळ आल्यास आत्मदहन करण्याचीही तयारी असल्याचे प्रतींनिधीशी बोलताना दिनेश पवार सुनील डीवरे यांनी सांगितले
