Home यवतमाळ कळंब येथे पोषण अभियान माह चे समारोप कार्यक्रम

कळंब येथे पोषण अभियान माह चे समारोप कार्यक्रम

16

कार्यकारी संपादक राजु चव्हाण

कळंब येथे पोषण अभियान माह चे समारोप कार्यक्रम
——————————————–
यवतमाळ- वयोगट ० ते ६ मधील बालक, स्तनदा माता व गरोदर माता यांचे साठी सकस आहार म्हणून शासनाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहार अभियानाचे १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण माह म्हणून साजरा केल्या जातो. तो माह कळंब येथे राबवून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ३० सप्टेंबर ला समारोप करण्यात आले.
बालकांचा विकास व्हावा, तो कुपोषित चा बळी पडू नये त्याच प्रमाणे स्तनदा माता व गरोदर माताना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहाराचे वाटप केल्या जाते. याची जागृती राहावी पोषण आहाराचे महत्त्व कळावे अश्या अनेक उद्देशातून १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण माह म्हणून साजरा केल्या जातो. त्यानुसारच कळंब तालुक्यात हा माह साजरा करण्यात आला. त्याचा समारोप जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती जयाताई पोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले तर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विधाते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पोषण अभियानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी अंगणवाडी सेविकांच्या आहार प्रदर्शनी आकर्षक ठरले. सोबतच डाश बोर्ड वर एंट्री करणाऱ्या सेविकांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका योगिता कूमरे यांचे सह जोडमोहा बिट व कळंब बिटच्या सर्व सेविकांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©