वणी तालुका प्रतिनिधी निलेश अ.चौधरी
भारतीय जनता व्यापारी आघाडी संघटनेच्यावतीने आमदार संजय रेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस साजरा
वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, यांच्या वाढदिवसानिमित्त विधासभा क्षेत्रामध्ये विविध सामाजिक कार्य तसेच स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील लोकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून,भारतीय जनता पक्षामध्ये माजी मंत्री हंसराज भैय्या अहीर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यामुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्राचे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी संघटनेचे उपाध्यक्ष रवि रेभे व सचिव नितीन बिहारीसह ,अनिल रेभे, जयेश रेभे, प्रथमेश रेभे, दत्ता जुनघरीसह समस्त वणी शहरातील व्यापारी बांधवांनी, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला.
