Home यवतमाळ गोंडराजे शंकरशहा मडावी व रघुनाथशहा मडावी,, यांचा शहीद दिवस साजरा.

गोंडराजे शंकरशहा मडावी व रघुनाथशहा मडावी,, यांचा शहीद दिवस साजरा.

14

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

गोंडराजे शंकरशहा मडावी व रघुनाथशहा मडावी,, यांचा शहीद दिवस साजरा.
——————————————
घाटंजी- तालुक्यातील मुरलीयेथे गोंडवाना संग्राम परिषद तर्फे गोंडराजे शंकर शाह मडावी व रघुनाथ शाह मडावी,, शहीद दिवस साजरा करण्यात आला.. यनिमित्त,, गोंडाराजे शंकर शाह मडावी व रघुनाथ शाह मडावी यांच्या प्रतिमेस सलामी देऊन, मानवदंना देण्यात आली. गोंडी धर्माची प्रार्थना घेऊन, कार्यक्रमांची सुरुवात करण्यात गोंड राजे शंकर शाहा व रघुनाथ शाहा मडावी यांना मानवंदना
गोंड राजे शंकर शाहा व रघुनाथ शाहा मडावी यांच्या १६४ व्या बलिदान दिवस शहीद दिवसाच्या निमित्याने त्यांना मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
इतिहास साक्ष आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या क्षितिजावर ती हजारो गोंडवाणाचे शाहिद वीर तारे झळकले परंतु तत्कालीन इतिहासकार व राज्यकर्त्यांनी गोंडवाणातील या शाहिद वीरांच्या सांडलेल्या कुर्बाणी रक्ताची नोंद घेण्यात आलेली नाही हा इतिहास लिहिल्या गेला नाही ही या शहीद कुर्बाणी रक्तशी केलेली बेईमानी आहे.असे विचार मा. ति.डॉ. निरंजन मसराम ( राष्ट्रीय अध्यक्ष गोंडवाना संग्राम परिषद व महामंत्री राष्ट्रीय गोंडवाना पार्टी) यांनी व्यक्त केले.
गडामडला राजघराण्याचे १७५० वर्ष एकछत्री राजकारभार या देशात केला त्या वैभवशाली राजघराण्याचे वंशज थोर शहिदांच्या मालिकेलीत एक शिरोमणी गोंड राजे १८५७-१८५८च्या लढ्याचे सर सेनापती व त्यांचे सुपूत्र राजकुमार रघुनाथ शाह मडावी यांना इंग्रजांनी १८ सप्टेंबर ला मध्य प्रदेशातील जबालपूरच्या एल्गिन चौकात तोफेच्या तोंडी बांधून खुलेआम एकाच वेळी पिता पुत्राला उडऊन दिले .या वीर पुत्राचा बलिदान देशाचे स्वातंत्र्य करीत आहे म्हणून त्यांना मानवंदना देण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवडू सुरपम(जिल्हा उपाध्यक्ष गो. स.प.)प्रमुख पाहुणे संघपाल कांबळे(तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)मोतीराम कनाके(जिल्हाध्यक्ष गो.स.प.)कोहचाडे गुरुजी प्रकाश कोवे,उज्वला आत्राम सरपंच मुरली,
कार्यक्रमाचे विनित नथु वेट्टी तालुकाध्यक्ष रा. गो. पा. शंकर मेश्राम तालुकाध्यक्ष रा. गो. पा.बळीराम कुमरे तालुकाध्यक्ष गो.स.प. विठ्ठल सोयाम तालुकाध्यक्ष गो.स.प.रमेश कुमरे सचिव गो.स.प. तुकाराम कोरवते सचिव व. ब.आघाडी ,यवतमाळ जिल्हा कमेटीचे व विविध तालुक्यातील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
कार्यक्रमाचे आयोजन अनंत घोडम, उज्वला आत्राम,राजू मडावी, किशोरि आत्राम,शीतल कोवे, मोतीराम आडे, रामजी कोवे, लक्ष्मीबाई तोडसाम,गुणवंत कुमरे, लक्ष्मण मंगांम, रामदास आत्राम, विष्णू कोवे, पुंडलिक आत्राम, रामदास आडे, धर्माजी मडावी, सुनील मडावी संपुर्ण समाज मुरली

Copyright ©