राळेगाव तालुका प्रतिनिधी राजिक शेख
AFPRO संस्थेमार्फत कृषी जनजागृती रथाचे आयोजन
आज दिनांक 23/09/2021
ला राळेगाव कृषी विभागात कृषी जनजागृती रथाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
AFPRO संस्थेमार्फत राळेगाव तालुक्यात माती व पीक संरक्षक मूल्यआधारित शाश्वत पीक व्यवस्थापन प्रकल्प इन्स्टिट्यूट फार सस्टेनेबल कमुनिटी (ISC) यांच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत आहे.
सदर प्रकल्पामार्फत राळेगाव येथील इंझापूर, धानोरा, येवती, परसोडा, चहांद ,रानवड, सावनेर, आंजी, तेजनी, खडकी (सुकळी). येथे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन व पाणी वापर महिला बचत गट सक्षमीकरण यावर मार्गदर्शन करण्यात येते
कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन व फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर कृषी जनजागृती रथाचे उद्घाटन माननीय श्री अमोल मंचलवार तालुका कृषी अधिकारी राळेगाव यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रकल्प व्यवस्थापक डॉक्टर मिलिंद साबळे व प्रकल्प समन्वयक श्री गजेंद्र चवळे तसेच कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी श्री राजू ताकसांडे व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रकल्पातील क्षेत्रीय कर्मचारी श्री दिनेश काळे, राकेश भोयर, प्रकाश सोनुले, संजय बडवाईक, कृपा वारकर ,नानुबाई कोवे यांनी केले.
पुढील आठवडा कृषी जनजागृती रथा मार्फत प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल गावात शेतकऱ्यांसोबत चर्चा सत्र करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर क्षेत्रीय संस्थेचे कर्मचारी व कृषी विभागाचे कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत. सध्या परिस्थिती बोंडसड व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन हे महत्त्वाचे मुद्दे असून त्याप्रमाणे कार्यक्रमाची नियोजन करण्यात येणार आहे
