जिल्हा प्रतिनिधी
‘ई-पीक पाहणी’ ॲप बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन…!
ग्रामीण व कृषी कार्यनुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कोमल सुरेश मेश्राम हिने बरबडा या गावात ‘ई-पीक पाहणी’ ॲप बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी’ हे मोबाईलवरील ॲप विकसित केले आहे. या ॲपचा वापर करून शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर करू शकणार आहे. या माहितीचा उपयोग शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पिककर्ज, पिकविमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे यामध्ये होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना मोबाईलवर प्ले स्टोअर मधून हे ॲप सहज घेता येते. या ॲपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. पिकाचा फोटो काढून तो ॲपवर अपलोड करू शकतो. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी त्यांच्या लॉगइन वर उपलब्ध होणार आहे, अशी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे उपप्राचार्य एम. व्ही. कडू कार्यक्रम अधिकारी एस. एस. सरप सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच गावातील शेतकऱ्यांनी उपस्थिती देऊन सहकार्य केले…
