राळेगाव तालुका प्रतिनिधि शेख राजिक
तहसील कार्यालयाचे वाहनचालक निलंबित
{कर्तव्यात कसूर व गोपनीयतेचा भँग करणे अंगलट आले ]
राळेगाव तालुका प्रतिनिधि शेख राजिक
राळेगाव येथील वाहन चालक व्ही. जी. सूर्यवंनशी तहसील कार्यालय राळेगाव यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळ यांनी आज तसे आदेश निर्गमित केले.
रेती तस्करी बाबत एक ऑडिओ क्लिप नुकतीच समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. यात सदर वाहन चालक पैशाची व दारू ची मागणी करत असल्याची तक्रार शिवसेना राळेगाव च्या वतीने जिल्हाधिकारी यांचे कडे करण्यात आली होती. कर्तव्यात सचोटी न राखणे गोपनीयतेचा भंग करणे आदी कारणास्थव त्यांना निलंबित करण्यात आले.
या कार्रवाहीने महसूल प्रशासनातील अनागोंदी कारभार चवट्यावर आला आहे. अव्हेद्य रेती तस्करीची किनार या प्रकरणाला असल्याची चर्चा आहे.
