एकदंत एंटर्प्रायज़ेज़ मिळविले, संपूर्ण विदर्भामध्ये मानाचे स्थान
संपूर्ण भारतामध्ये अग्रगण्य मानण्यात येणारी, मित्सुबिशी इलेक्ट्रिक वातानुकूल उपकरणे तयार करणारी कंपनी आहे. त्यामुळे संपूर्ण भारतासह विदर्भात सुद्धा या कंपनीच्या उपकरणाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे या कंपनीला आपल्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांना त्वरित सेवा मिळावी ,यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजना आणावी लागतात. याच बाबतीत वणी येथील एकदंत इंटरप्रायईजेसचे संचालक कार्तिक देवडे यांनी मागील चार वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण वणीसह विदर्भामध्ये वणीच्या नावाचा मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भामधून द्वितिय क्रमांकाच्या सर्विस वॅनचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे मित्सुबिशी कंपनीचे कुठल्याही प्रकारचे वातानुकुलीत उपकरण हे बंद पडल्यास ही सर्विस वॅन ग्राहकांच्या घरी जाऊन घरपोच सेवा देऊन , उपकरणाची त्वरित दुरुस्ती करून, ग्राहकांना होणारा नाहकत्रास व वेळेची बचत करण्यासाठी मदत करतील. या सर्व्हिस वॅनचा लोकार्पण सोहळा
शहराचे प्रथम नागरिक तारेंद्र बोर्डे व नारायणजी देवडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हुसेन बाशा हे राॅकवेल मिनरल्ज़ चे मॅनेजर, विजय जी चोरडिया, सुधीर साळी, तसेच मिस्तूबिशी इलेक्ट्रिक ऐयर कंडिशनर कंपनीचे विदर्भ एरिया मॅनेजर-प्रशांत ढोके, सर्विस मैनेजर -संजय इंगळे, गणेश पाटील, एकदंत इंटरप्राईजेस चे संचालक कार्तिक देवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी एकदंत एंटर्प्रायज़ेज़ चे अभियंता नारायण वर्मा, सर्विस मॅनेजर मंगेश वऱ्हाटे ,अमोल बुद्धे, स्टाक मॅनेजर अजय तोताडे, सीआरएम -अंकित बुरडकर व एकदंत इंटरप्राईजेस चे कर्मचारी उपस्थित होते.
