मुंबई विमानतळास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आल
आज अधिकृत गोर सेना च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले
नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे. मा. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा. वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी, उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले. हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल.
म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लाक्षणिक उपोषनात *गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष गणेश करमठोट व जिल्हा सचिव बालाजी जाधव* यांच्या कडून करण्यात आली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोर बंजारा समाजातील व इतर नागरीकांचे घरांचे व शेत जमिनींचे पट्टे मिळालेच पाहिजे
या संदर्भात निवेदन श्री.उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत, मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर.
श्री.विजय वडेट्टीवार साहेब पालकमंत्री चंद्रपूर
निवेदन देण्यात आले गोर सेनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण समर्थक पत्र मा.रामराव चव्हाण वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष
मा.अरविंद चव्हाण बंजारा विकास फाउंडेशन अध्यक्ष
मा.सुदाम राठोड युवा आघाडी/
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर
मा.मुकेश चव्हाण राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष
मा.अशोक जाधव आल इंडिया बंजारा टायगर्स महाराष्ट्र राज्य महासचिव तसेच प्रत्यक्ष सहकार्य लाभले मा.सुदाम राठोड सर गोर सीकवाडी चंद्रपूर उपोषण कर्ते गणेश करमठोट- प्रदेश उपाध्यक्ष(महाराष्ट्र राज्य), बालाजी जाधव जिल्हा सचिव चंद्रपूर, पंडीत राठोड जिल्हा सहसचिव, अशोक जाधव जिल्हा कोषाध्यक्ष,राहुल जाधव.ता.संयोजक चंद्रपूर, गोपीनाथ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते,विक्की जाधव जिल्हा संघटक, अजय जाधव सदस्य,रामचंद्र राठोड, विशाल पवार,प्रदिप पवार, गोविंद पवार, परमेश्वर चव्हाण
उपस्थित होते..
