डिस्ट्रिक्ट वुशू असोसिएशन यांचा विद्यमाने आयोजित 15 वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडू कु. अश्विनी गणेश उईके, कु. गायत्री आनंद आडेकर, हेमंत गणेश उईके सिनियर वयोगाटात आपला उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन प्रथम क्रमांक प्राप्त केले. वर्धा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वुशू क्रीड़ा स्पर्धेत आपले नाव नोंदवले आहे तसेच गौरव रविन्द्र महानुर यानी द्वितीय क्रमांक प्राप्त केला या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, अजित मिश्रा, व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े, रविन्द्र महानुर, विनोद खोडकुंबे व मनोज गुजरे यांनी केले.
