अध्यात्मिक आघाडी व भारतीय जनता पार्टीचे पोलीस स्टेशनला निवेदन
मुंबई येथे संपन्न झालेल्या दसरा मेळाव्यात समाजामध्ये तेढ व असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात दंगली व्हाव्यात,या उद्देशाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधात भडखाऊ भाषण देऊन,त्याला समाजातील जमावाने मारहाण करून, त्याची बदनामी करावी. समाजात कायमचे तेढ निर्माण होऊन दंगा निर्माण होऊन समाजाचे नुकसान व्हावे,असे चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावे,या मागणीचे निवेदन अध्यात्मिक आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस स्टेशन दिग्रस येथे देण्यात आले.
हिंदू धर्मात अतिशय विश्वास असलेले,हिंदू धर्मपती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हिंदू धर्माचे प्रखर समर्थक आणि भारत मातेची समर्पित असलेले नागरिक आहेत.ते धार्मिक संत म्हणून समाजामध्ये त्यांचा अतिशय विश्वास,आदर व श्रद्धा असून ते सर्वांना पूजनीय आहेत. सदर दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध दुष्ट हेतूने हिंदू धर्मियांच्या,त्यांच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या जनतेच्या भावना दुखावण्याचा व हिंदू धर्माच्या विरुद्ध इतर समाजातील लोकांना चिथावणी देऊन दंगे निर्माण व्हावेत व त्यायोगे सामाजिक धार्मिक तणाव निर्माण व्हावे,या उद्देशाने उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अतिशय प्रक्षोभक,हीन दर्जाच्या शब्दांचा वापर केला आहे. हे योग्य असेल तर ते मुख्यमंत्री कसे होऊ शकते?असा संतप्त सवालही निवेदनात समाविष्ट आहे.
त्यांनी त्यांच्या भाषणात योगी आदित्यनाथ यांना चपला घेऊन थोबाडीत मारावी,असे चिथावणीखोर वक्तव्य केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दंगे व्हावेत,या हेतूने भडकाऊ भाषण करून गुन्हा केला आहे.तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलाने मारले असते व ते जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना चपलाने मारू,अशी धमकी दिली. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे अपमानजनक भाषा, मारण्यासाठी चिथावणी देणारे भाषण व जीवे मारण्याकरिता प्रोत्साहित करणारे वक्तव्य करून योगी आदित्यनाथ यांचा अपमान केला आहे.समाजामध्ये तेढ निर्माण केले आहे.त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे.त्यांनी केलेल्या गुन्ह्याची चौकशी करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी,असेही निवेदनात म्हटले आहे.
