Home यवतमाळ अबब.. चार फूट सोयाबीन पिक वाढून फुल शेंगा न आल्याने शेतकरी चिंतेत

अबब.. चार फूट सोयाबीन पिक वाढून फुल शेंगा न आल्याने शेतकरी चिंतेत

11

——————————————–
भांब राजा येथिल शेतकऱ्यांची व्यथा.
——————————————–
यवतमाळ- तालुक्यातील भांब राजा येथिल शेतकरी विजय मनवर बाबू, देविदास ठाकरे यांनी सुरुवाती पासूनच शेतीची उत्तम मशागत करून सोयाबीन पिकाची पेरणी केली. आणि त्या उगवलेल्या पिकाचे सर्वोतोपरी उत्तम संगोपन करीत यावर्षी चांगले पिक येईल व सोयाबीनचे वाढलेले बाजार भावानुसार पैसाही चांगला मिळेल असे स्वप्न रंगविले आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक तीन ते चार फूट वाटले असून त्याला शेंगाची लाग तर सोडाच साधे फुल सुध्दा न आल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
यावर्षी वाढीव भावाचा दृष्टीकोन पुढे करून चांगले उत्पन्न घ्यायचे असे ठरवून असलेले शेतकरी मनवर व ठाकरे यांनी इकडून तिकडून बि बियाण्याची व्यवस्था केली. त्या पिकाची वेळोवेळी दक्षता घेतली. यात काही दिवसात आपले पिक बहरून चांगले पिक बहरेल असे बाळगले होते. मात्र तीन ते चार फूट पिक वाढून त्याला फुल अथवा कोणतेही शेंगा लागल्याचे दिसत नसल्याने ही बाब त्यांनी कृषी विभागाच्या लक्षात आणून देताच कृषी विभागाचे मंडळ अधिकारी राजेंद्र फाळके, कृषी पर्वेक्षक ए. वी. दिवे, कृषी सहाय्यक भारती चांदेकर यांनी या शेतात जावून या पिकाची पाहणी केली. यावेळी भांब राजा येथिल सरपंच अनुप्रिया सुनिल डीवरे, ग्रा. प. सदस्य सुनिल डीवरे, यांचे सह गावकरी अमृत जगताप, प्रणय वानखडे, गोलू राठोड, गोलू धार्मिक, नितिन धार्मिक व शेतकरी ठाकरे आणि मनवर उपस्थित होते. यावर कृषी विभाग काय पर्याय काढतात याकडे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.

Copyright ©