Home यवतमाळ दिग्रस येथे जागतिक आदिवासी दिन भव्य दिव्य साजरा

दिग्रस येथे जागतिक आदिवासी दिन भव्य दिव्य साजरा

12

सर्व पक्षीय पदाधिकार्यांची उपस्थित

शहरात बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन भगवान बिरसा मुंडा प्रतिमेचे पूजन करुन साजरा करण्यात आला.जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी तालुका कृषी विभाग व आत्मा च्या वतीने रान भाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी टी कन्नाके, प्रमुख पाहुणे प.स सभापती अनिता राठोड, उपसभापती सुदाम राठोड, तहसीलदार राजेश वझीरे, ठाणेदार सोनाजी आम्ले,बिडीओ रमेश खरोडे, तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत, कृषी मंडळ अधिकारी चंदन पवार,कृषी मंडळ अधिकारी अर्जुन जाधव, काँग्रेसचे अध्यक्ष शंकर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लालसिंग राठोड, बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल शिंदे,बिकेडी उपाध्यक्ष अनिल पेदोर, भाजप शहराध्यक्ष स्वप्निल दुधे,नगरसेवक वसंतराव मडावी, नगरसेवक सै. अक्रम , नगरसेवक केतन रत्नपारखी, मुरलीधर कांबळे, भारत महिंद्रे, गणेश रोकडे, संजय खंडारे, रमजु पटेल, मान्यवर उपस्थित होते
निसर्गामध्ये उपलब्ध रानभाज्या,फळे यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व तसेच सध्या परिस्थिती जंगलातील व शेत शिवारातील नैसर्गिक रित्या उगवल्या जाणारया रानभाज्याचे,रानफळाचे महत्व व आरोग्य विषयक उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप जवादे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कुडवे आभार प्रदर्शन भिमराव खारोडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम आर सोळंके, भारत मेसराम, विनोद नाटकर, विनोद कोवे, शाम ससाने, सगित पवार, सागर बोंडे परिश्रम घेतले. तालुक्यातील समाज बांधव आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©