Home यवतमाळ “गुरु महिमा ” —गजानन गोपेवाड

“गुरु महिमा ” —गजानन गोपेवाड

13

“गुरुमहिमा”
एकही लक्ष गुरुर्देवो ।। एकही ध्यान आत्मध्यान।। एकही लक्षगुरुचरण, एकही ग्यान आत्मग्यान ।।
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून सर्व आदरणीय गुरूवर्य यांना सर्वप्रथम वंदन,आपल्या कार्यास नमन,
आज आपला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगती कडे वाटचाल करताना आपण पाहत आहोत. यामधील सिंहाचा वाटा शिक्षकांचा आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही. आपण आदरणीय गुरूवर्य दिवस —रात्र विद्यार्थ्यांप्रती व त्यांच्या प्रगती साठी सतत झटत आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्यांची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे.
आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या आधूनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञाननिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, सहकार्य समाजाभिमुखता,साहस या गुणांनीयुक्त व्यक्तीमत्त्वाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे.अशी व्यक्तीमत्त्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
अशक्य असे काहीच नाही , हे आपल्या शिक्षकांनी दाखवून दिले आहे. सद्यःस्थितीतील शिक्षणपद्धती हि विद्यार्थी केंद्रीत आहे. अध्ययन— अध्यापनात विद्यार्थी हाच केंद्र— बिंदू समोर ठेवून पाठ्यपुस्तकात असलेला घटक, उपघटक व अध्ययन —अध्यापन करीत असतो.
“विद्यार्थी हेच आपले दैवत” समजणारी शिक्षक मंडळी आम्ही पाहत असतांना मनस्वी आनंद होतो .शिक्षक देशाचा कणा आहे अस म्हटले तर या प्रसंगी वावगे ठरणार नाही. कारण शिक्षकच भावी देशाचा नागरिक घडविण्याचे काम करत आहे.
शिक्षक एका कुभारा प्रमाणे—
कुंभार जसे चिखला पासून घडा बनवतो व भट्टीत भाजले कि घडा टणटन वाजतो. अगदी त्याच प्रमाणे शिक्षक सुध्दा आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो. आपण पाहतो राजकिय ,शैक्षणिक ,वैज्ञानिक , औद्योगिक, अध्यात्मिक, विधी व न्याय, कृषी, वैद्यकिय, इंजीनिअरिंग व वैमानिक यांसारख्या विविध क्षेत्रात विद्यार्थी घडवून पाठवत असतो, हि किमया फक्त आणि फक्त शिक्षकच करू शकतो.
असेच माझे गुरूवर्य आदरणीय मातृ— पितृ देवो!! भव !!! मा. मिलिंद कुबडे (प्राचार्य डायट यवतमाळ), आदरणीय गुरूवर्य मा. नितीन भालचंद्र (अधिव्याख्याता गणित विभाग प्रमुख , डायट यवतमाळ) आदरणीय गुरूवर्य मा. दिपक मेश्राम (अधिव्याख्याता विज्ञान विभाग प्रमुख, डायट यवतमाळ) यांच्या चरणी गुरु पूर्णिमा निमित्ताने माझा लेख अर्पण करत आहे.
शिक्षक— विद्यार्थी यामधील गुरू— शिष्य परंपरा हि कधीच न संपणारी प्रक्रिया आहे. अखंड व अविरतपणे शैक्षणिक कार्य करणारे माझे शिक्षक, गुरजन व गुरूवर्य हि जरी परिभाषा बदलली तरी शिक्षक विद्यार्थी यामधील नातं कधी संपूच शकत नाही. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पेक्षा मोठा होतांना पाहत असतांना कधीही गर्वाने मान उंचावतो ,त्यांना आपला विद्यार्थी उच्च पदावर पोहोचला की आनंद गगनात मावत नाही. या माझ्या अखंड भारताला परंपरेनुसार गुरु व त्यांचे वंदन करण्याची परंपरा व संस्कृती आहे, गुरुच आपले माता— पिता. असे आदराचं स्थान गुरुंचे आहे.महान व्यक्तीमत्त्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे.माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी शिकत असतो.
जो—जो ज्याचा घेतला गुण ।तो —तो गुरु म्या केला जाण ।
हे ओळखून प्रत्येक गुरुंविषयी/ शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.
गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर समस्त गुरूजनांच्या चरणी नतमस्तक .

 

Copyright ©