Home यवतमाळ आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमध्ये निघत आहे गरम पाणी !

आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमध्ये निघत आहे गरम पाणी !

11

 

जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा येथे बोअरवेल मधुन गरम पाणी निघत असल्याची चर्चा पसरली असतानाच आता आर्णी तालुक्यातील लोणी येथील साहेबराव पानचोरे यांच्या घरी असलेल्या बोअरवेल मधुन गरम पाणी येत आहे या अजब प्रकाराने आश्चर्य वाटत असले तरी गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या रविवारी जिल्ह्यातील महागाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अशातच महागाव तालुक्यातील अंबोडा गावात एका बोअरवेल मधुन गरम पाणी येत असल्याची वार्ता पसरली आहे यामुळे भुकंप झाल्यावर बोअरवेल मधुन निघणारे गरम पाणी चर्चेचा विषय झाला आहे.
अशातच एक भर म्हणजे लोणी येथील प्रकार समोर आला असल्याने गावकऱ्यांनी भिती व्यक्त केली आहे. साहेबराव पानचोरे यांनी सहा वर्षापूर्वी घरी असलेल्या अंगणात बोअरवेल खोदली आहे हा बोअरवेल 150 फूट खोल असल्याचे घरमालकाने सांगितले आहे व त्या बोरवेल मधुन गेल्या महिन्यापासून गरम पाणी निघत आहे. सुरुवातीला कमी प्रमाणात पाणी गरम निघत होते आता जास्त प्रमाणात गरम पाणी निघत आहे या विषयी फोन वरुन तलाठी उबाळे आणि आर्णी तहसीलदार यांना माहिती दिली असल्याचे निलेश पानचोरे यांनी सांगितले.

त्या बोरवेल मधून सुरवातीला थंड पाणी येते व काही वेळानंतर गरम पाणी निघायला सुरवात होते त्यामुळे येणारे गरम पाणी हे भूगर्भातून येते की काही इलेक्ट्रॉनिक बिघाडामुळे येत आहे अशीही चर्चा सुरू आहे.

बोअरवेल मधून येणाऱ्या पाण्याला लागतो अर्थिंग.

लोणी येथील साहेबराव पणचोरे यांच्या गरच्या बोअरवेल मधून गरम पाणी येत आहे हे पाहत असताना बोअरवेल मधून येणाऱ्या पाण्याला हात लाऊन पाहिले असता पाणी एकदम चटके लागेल असे निघत होते मात्र त्या पाईपला हात लावल्यावर त्या पाण्यासोबत अर्थींग ही लागत होता त्यामुळे इलेक्ट्रॉनिक बिघाडामुळे तर पाणी गरम होत असेल तर नाही ना असेही जाणकार बोलत आहे.
बेरिंग ज्याम झाल्याने ही असा प्रकार होऊ शकतो असे जाणकारांन चे मत येत आहे.
बोअरवेल मधील समर्सिबल मोटारीचे बेरिंग ज्याम झाले तर मोटार हिट होते व पाण्यात आर्थिंग येत असल्याने मोटार दुसरी टाकून बघावे लागेल त्यानंतरच कळेल पाणी भूगर्भातून येत आहे की इलेक्ट्रॉनिक बिघाडामुळे असे मत लोणी येथील इलेक्ट्रॉनिक्स
गौरव आंबाडे यांनी व्यक्त केले.

Copyright ©