भारतीय जनता पार्टी,यवतमाळ जिल्ह्याचा सुप्त उपक्रम..
10 जुलै रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर नारिंगे नगर येथे मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा जिल्हा सचिव सुरज गुप्ता यांच्या संयोजनामध्ये आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप व नोंदणी करून या अभियानाचे शुभारंभ करण्यात आले.भाजपा जिल्हा महामंत्री राजुभाऊ पडगीलवार ,शहर अध्यक्ष प्रशांतभाऊ यादव पाटील,न.प.गटनेते विजुभाऊ खडसे,सभापती सौ.सुजताताई कांबळे,जी.प.समता गृहनिर्माण संस्था अध्यक्ष काळे काका,योजनेचे जिल्हा व्यवस्थापक चिव्हाणे सर,शहर संयोजक पवन शर्मा ,वि.आ.जिल्हाध्यक्ष अजिंक्य शिंदे बूथ प्रमुख नितीनजी संगेवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या व त्या अमलात सुद्धा आणल्या. याचाच एक भाग म्हणून आजच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे सर्वांच्या आरोग्यकरिता सुरक्षा कवच मिळावा म्हणून नरेंद्र मोदीजी यांनी आयुष्यमान भारत योजना संपुर्ण भारतभर लागू केली आहे.या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेशी करार झालेल्या कोणत्याही रुग्णालयात रुपये पाच लक्ष पर्यंत चा विमा कवच प्रतिवर्षं जवळपास तेराशे आरोग्य सुविधा करिता लागू होणार आहे.या करिता मा.आ.मदनभाऊ येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यवतमाळ विधांसभेमध्ये आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप व नोंदणी अभियान सुरज गुप्ता यांच्या संयोजनामध्ये राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या शुभारंभ वेळी मा.आ.मदनभाऊ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची रूपरेषा सुरज गुप्ता यांनी प्रस्तावणे मध्ये मांडली तसेच कार्यक्रमाचे संचालन *वि.आ.जिल्हाध्यक्ष अजिंक्य शिंदे* तर आभार प्रदर्शन *जिल्हा सचिव अविनाश कदम यांनी केले.*
या कार्यक्रमाला आध्यत्मिक आघाडी प्रदेश चे शंतनू शेटे,बाबू कांबळे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष अश्विन बोपचे,उ.भा.आघाडी जिल्हा सचिव आशिष तिवारी,वि.आ.जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय बाळापुरे,युवा मोर्चा जिल्हा सचिव योगेश पाटील,वि. आ.शहर महामंत्री नयन गुप्ता, उपाध्यक्ष अजय चमेडिया,सचिव अथर्व ठाकरे,वेदांग नागोसे,सुमिरण गोजे,शुभम देशपांडे,
जे ई डी एंटरप्राइजेस च्या टीम चे अनुप दाभेकर,आकाश कावलकर,प्रशांत कपाट तसेच भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चा,वि.आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ता व स्थानिक नागरिक उपस्थित होते
