Home यवतमाळ ऐन पावसाळ्यात शासनाचा गरीबांना मायेचा उबदार निवारा,

ऐन पावसाळ्यात शासनाचा गरीबांना मायेचा उबदार निवारा,

8

——————————————–
लाभार्थ्यांना घरकुलांच्या ई गृहप्रवेश व्दारे दिल्या चाव्या!
——————————————–

महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेचे घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत राज्यभर ई गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राबविण्यात आला. याच वेळी जिल्हा, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत स्तरावर देखील लाभार्थ्यांना घरकुलाची चाबी सुपूर्द करण्यात आली. घाटंजी पंचायत समितीच्या सभागृहात सुध्दा हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शासनाने आम्हाला मायेचा उबदार निवारा दिला अशी भावना घाटंजी तालुक्यातील लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या असे विचारले तर सहज उत्तर मिळते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर गोर गरीब अन्न वस्त्र कसे तरी मिळवतात पण निवारा निर्माण करणे म्हणजे अवघडच! त्यामुळे शासनाने समाजातील गोरगरीब, कष्टकरी, कामगार, आदिवासी यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून प्रथम इंदिरा आवास योजना सुरू केली. कालांतराने या मध्ये अजूनही विविध घरकुल योजनांचा समावेश केला गेला. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना आदिम जमाती योजना आदीचा समावेश करण्यात आला. यामागील उद्देश एकच की, गरिबांना निवारा मिळाला पाहिजे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरावरील कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात मलबार हिल मुंबई येथे घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यासाठी ई गृहप्रवेश कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम राज्यभर एकाच वेळी आयोजित करण्यात आला यानुसार घाटंजी पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यासाठी ई गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान अमोल प्रकाश भगत, संगीता दिनेश दुबे, गोविंदा मडावी यांना घरकुल चाब्या सुपूर्द करण्यात आले. सोबतच या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या येरडगाव येथिल सरपंच दिपाली प्रफुल गावंडे उपसरपंच अमोल ठाकरे, ग्रामसेवक मंगेश कुरहाडकर तलाठी सिडाम आशा वर्कर संगीता जाधव यांनी संपूर्ण गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे गावात ९० टक्के लसीकरण करून घेतल्या बद्दल त्यांचे गौरव करण्यात आले.
यावेळी घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निताताई आकाश जाधव, उपसभापती सुहास देशमुख पारवेकर, तहसिलदार पुजा मातोडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वामन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रणधीर आत्राम, निलेश माणगावकर यांचे सह पंचायत समितीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Copyright ©