Home यवतमाळ शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी...

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन

31

 

बोगस खते बियाणे विक्रीवर विभागाची करडी नजर

दिग्रस : महाराष्ट्रा मध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे येत्या 2 ते 4 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते , कृषी हवामान शास्त्र विभाग ,पुणे यांनी वर्तवली आहे.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. यामुळे दुबार पेरणी चे संकट टाळल्या जाऊ शकते. अवकाळी पावसाला मोसमी पाऊस समजून सोयाबिन पिकाची पेरणी करु नये, मुख्य मोसमी पावसाला सुरुवात झाल्यांनतर चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करावी अन्यथा उगवण कमी होते. सोयाबिन बियाणे 4 सेमी मीटर पेक्षा जास्त खोल पेरु नये अन्यथा उगवण कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबिन पेरणी बी.बी.एफ. पेरणी यंत्राने करावी. बी.बी.एफ यंत्राने पेरणी केल्यास एकरी 22 किलो बियाणे लागते व एकरी 8 किलो सोयाबिन बियाणाची बचत होते. उगवण चांगली होते. तसेच उत्पादनात वाढ होते. टोकन पध्दतीने पेरणीकेल्यास एकरी 8 किलो बियाणे लागते व बियाणात बचत होते. सध्या बोगस खते बियाणे विक्रीवर विभागाची करडी नजर ठेवली जात आहे.

पेरणी करण्यापुर्वी सोयाबीन बियाणास प्रथम बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करुन नंतर रायझोबिअम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी. कृषी निविष्ठा बियाणे खरेदी करते वेळी जागरूक रहावे बिल संभाळून ठेवावे. शेतकऱ्यांनची फसगत झाल्यास लगेच तक्रार करण्याचे अहवान महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा मार्फत करण्यात येत आहे.

Copyright ©