श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवरायांचा राज्यभिषेक ६जुन १६७४ दिवशी झाला. त्यामुळे ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथी प्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक खास गोष्ट घडली. हा सोहळा आता ‘शिवस्वराज्य दिन ‘म्हणून साजरा करण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून हा निर्णय राज्यातील उध्दवजी ठाकरे सरकारने घेतला. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आपण ऐकले तर तो एक दैदिप्यमान सोहळा होता. यात राजांचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले. हे दोन मुख्य विधी पार पडल्या नंतर महाराज छत्रपती झालेत. यावेळी शिवाजी महाराजांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. हाताची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करून महाराजांना हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. गागाभट्ट आणि इतर ब्राम्हणांनी मंत्रोच्चारण करत शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा केला त्यानंतर ३२ मण सोन्याने सजवलेल्या भव्य सिंहासनावर महाराज आरुढ झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन महाराजांवर अतूट प्रेम करणाऱ्या प्रजेने महाराजांना अंत:करणातून आशीर्वाद दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून ‘शिव स्वराज्य दिन’ ग्रामपंचायत कार्यालय हिवरी
ता. जि. यवतमाळ येथे साजरा करण्यात आला. छत्रपती
श्री. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून पुजन करण्यात आले. या प्रसंगी सौ. रंजना सिद्धार्थ भगत (सरपंच)
श्री. अभिजीत गोविंद मुरखे(उपसरपंच) ग्रामविकास अधिकारी श्री. बि. एन. ठाकरे माजी सरपंच श्री. तुकाराजी शहारे , श्री सुभाष मडावी, ग्रा.पं.सदस्य श्री. विठोबा कोडापे ग्रामपंचायत कर्मचारी अशोक मानकर, विनोद ठाकरे, रंजीत महेर, संगणक परिचालक काशीनाथ कुमरे, शंकर ठाकरे, संदिप खोडकुंभे व गावकरी मंडळी उपस्थित होते.
