Home यवतमाळ 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे दुप्पट जिल्हयात 175 कोरोनामुक्त,...

24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे दुप्पट जिल्हयात 175 कोरोनामुक्त, 81 पॉझेटिव्ह, 2 मृत्यु जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1967 बेड उपलब्ध

9

 

यवतमाळ, दि. 3 जून : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट आहे. जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह तर 175 जण कोरोनामुक्त झाले असून 2 जणांचा मृत्यु झाला. यातील एक मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी एकूण 4605 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 81 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4524 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 990 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 485 तर गृह विलगीकरणात 505 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72179 झाली आहे. 24 तासात 175 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69419 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1770 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 35 हजार 373 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 62 हजार 257 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.36 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.76 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 59 वर्षीय पुरूष ,तर खाजगी रुग्णालयात वणी तालुक्यातील 72 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे .

पॉझेटिव्ह आलेल्या 81 जणांमध्ये 51पुरुष आणि 30 महिला आहेत. यात आर्णी येथील 1, बाभुळगाव येथील 4, दारव्हा येथील 2, दिग्रस येथील 11, घाटंजी 2, कळंब 0, महागाव येथील 3, मारेगाव येथील 3, नेर येथील 7, पांढरकवडा 6, पुसद येथील 14, राळेगाव 1, वणी येथील 14, यवतमाळ 8 तर झरीजामणी येथील 2 रुग्ण आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1967 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 312 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1967 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 93 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 484 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 95 रुग्णांसाठी उपयोगात तर 431 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 124 उपयोगात तर 1052 बेड शिल्लक आहेत.

___________________________

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना

लाभ घेण्यासाठी 18 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 03 :- एकात्मिक आदिवासी विभागामार्फत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन 2020 -21 अंतर्गत पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना आटाचक्कीचा पुरवठा, कुक्कुट पालनाकरीता अर्थसहाय्य, मोटार ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देणे, शेळी पालन, दुधाळ जनावरे, काटेरी तारकुंपण, तुषार सिंचन व ठिंबक सिंचन या करीता अर्थसहाय्य तसेच महिला व पुरुष बचतगटास जलशुध्दीकरण प्रकल्प देणे या योजनेकरीता लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 18 जून 2021 पर्यंत परिपूर्ण कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत सादर करावे. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेकरीता पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, महागाव व उमरखेड या 7 तालुक्यातील पारधी लाभार्थ्यांनी अर्ज करावेत. सदर योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद तसेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह दारव्हा, दिग्रस व आर्णी या ठिकाणी उपलब्ध आहेत.

पारधी लाभार्थ्यांना मोटार ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देणे, पारधी जमातीच्या गरजांचे सर्व्हेक्षण करणे, बालसंस्कार केंद्र संस्थेमार्फत राबविणे याकरीता पात्रताधारक संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, पुसद येथे सादर करावेत. वरील योजनेकरीता लाभार्थ्यांनी व संस्थांनी अर्ज / प्रस्ताव 18 जून 2021 पर्यंत परिपूर्ण कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत सादर करावे. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

__________________________

बियाणे उगवण क्षमता चाचणी व बिज प्रक्रिया करण्याचे फायदे

यवतमाळ, दि. 03 : प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी, असा शेतकरी बांधवांचा समाज आहे.परंतू सोयाबीन, मुंग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमुंग, गहू यासारख्या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्याने कोणतेही संकरीत वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणाचे बियाणे एकदा खरेदी केल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे पुढे दोन वर्ष बियाणे म्हणून वापरू शकतो. त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी व पेरणी पूर्व बीज प्रक्रीया करावी, असे आवाहन यवतमाळ तालुका कृषी अधिकारी शांताराम धनुडे यांनी केले आहे.

बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रीया करण्याची सोपी पध्दत : बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर बियाणे बाहेर काढावे, सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे. गोणपाटाचे 6 चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्यावे, एक तुकडा जमीनीवर पसरवावा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट 100 दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर 10 – 10 च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ठेवावे, अशाप्रकारे 100 दाण्यांचे तीन नमूने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओल करावे व बियान्यांवर दुसऱ्या गोणपाटाच्या तुकडा अंथरूण पुन्हा चांगले पाणी मारावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा, त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा-सात दिवसानंतर ही गुंडाळी जमीनीवर पसरून उघडा, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तीन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून 100 पैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणे सारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजा आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या 70 पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावे. पेरणी करताना सोयाबीन बियाण्यास कार्बोक्सिन 75 टक्के डब्ल्यू. पी. 2 ते 2.5 ग्राम किंवा कार्बोक्सिन 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के (मिश्र घटक) 2 ते 3 ग्राम प्रती किलो किंवा 4 ग्राम ट्रायकोडर्मा भुकटी बियाण्यास चोळावी, जेणेकरून मुळकूज व खोडकूज या रोगास प्रतिबंध बसण्यास मदत होते. सोयाबीन वरील खोडमाशीसाठी थायोमेथोक्झाम 34 टक्के एफ. एस. 10 मि.ली. प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी. तसेच रोपावस्थेतील कुजसाठी थायोफनेट मिथाईल 45 टक्के + पायरॉक्लोस्ट्राबिन 5 टक्के एफ. एस. 2 मि.ली. प्रती किलो बियाण्यास बिज करावी.

कापूस पिकावरील सरशोषक किडी (मावा, तुडतुडे) साठी थायोमेथोक्झाम 70 डब्ल्यू. एस. 4 ग्राम / किलो किंवा इमिडाक्लोप्रीड 70 डब्यूईल. एस. 9 ग्राम / किलो किंवा कार्बोसल्फान 25 डी.एस. 60 ग्राम /किलो पेरणीपूर्व बिजप्रक्रीया करावी व मर, करपा व मूळकूजसाठी प्रती किलो बियाण्यास फ्लूक्झपायरॉक्झड 33.3 टक्के एफ.एस. 1 मि.ली. किंवा थायरम 3 ग्राम किंवा 4 ग्राम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रीया करावी.

तूर पीक पीकातील मररोग, मुळकुजव्या व खोडकुजीसाठी ट्रायकोडर्मा 5 ग्राम किंवा कार्बेाक्झिम 37.5 टक्के डब्ल्यू.एस. + थायरम 37.5 टक्के डब्यू0 . एस. 4 ग्राम प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी आणि पेरणीसाठी बियाणे साठविताना अझाडीरेक्टिन 300 पीपीएम (5 मिली / किलो) बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

Copyright ©