Home यवतमाळ धम्मसेवक विपश्यनाचार्य धनपाल ताकसांडे काळाच्या पडद्याआड

धम्मसेवक विपश्यनाचार्य धनपाल ताकसांडे काळाच्या पडद्याआड

12

घाटंजी(तालुका प्रतिनिधी) पांढरकवडा तालुक्यातील पाथरी (रुंझा) येथिल रहिवासी धम्मसेवक विपश्यनाचार्य धनपाल नागोराव ताकसांडे वय ५८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
धनपाल ताकसांडे हे एक समाज प्रवर्तक होते त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात समाजसेवेचे व्रत अंगी बाळगून केवळ समाजात जनजागृती केली. त्यांनी आपल्या जिवनात मोह माया कधीच बाळगली नाही. ते समाज घडविण्यासाठी दूर दूर प्रयंत जायचे. त्यांना कोसोदूर प्रयंत समाज ओळखत होता. ते धम्मसेवक म्हणून कार्य करीत होते. त्यांनी विपश्यनेत स्वतःला वाहून घेतले होते. प्रत्येक समाज बांधव चांगल्या मार्गांनी रहावे याकरिता ते विपश्यनेचा मार्ग दाखवित होते. ते सामाजिक कार्यात अग्रेसर होत. आज हिच महान मूर्ती काळाच्या पडद्याआड गेल्याने समाज बांधवांची मोठी हानी झाली असून एक सच्चा धम्मसेवक गमावल्याने ही पोकळी पुन्हा भरून निघणे नाही. असे घाटंजी तालुक्यातील मुरली येथिल अरुण ताकसांडे यांनी सदभावना व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मुळगाव पाथरी (रूंझा) येथे अंतिम संस्कार करण्यात आले. याक्षणी त्यांना विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Copyright ©