राळेगाव –
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लघू व्यवसायीक, फेरीवाले यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. परीणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
त्रस्त झालेल्या या व्यवसायीकांनी आम्हाला कोरोनाची नव्हे , तर
उपासमारीची जास्त चिंता आहे. असे मत व्यक्त करीत आहेत.
कोरोना महामारीला नियत्रित करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील सर्व दुकाने बंद झाली आहे. जे व्यवसायीक दररोज हातावर कमावून आपल्या कुंटूबियांचे पोट भरत होते. त्यांची उपासमार होत आहे
काही जण चोस्न लपून आपला दुकानातील माल विक्री करीत असल्यास यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जातो. शासनाने लघू व्यवसायीक आणि फेरीवाल्यांना १ हजार ५०० रुपये रोख रक्कम व मोफत राशन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या खात्यात अद्यापही दमडीही जमा झाली नाही.
