Home यवतमाळ घाटंजी वनपरिक्षेत्रात जखमी बिबट्याचा (छावा) मृत्यू

घाटंजी वनपरिक्षेत्रात जखमी बिबट्याचा (छावा) मृत्यू

11

———————————————
रानटी डक्करानी जखमी केल्याचा प्राथमिक अंदाज
——————————————–
घाटंजी(तालुका प्रतिनिधी) वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या इंझाळा बिट मधील जंगला लगतच्या शेतात एक जखमी बिबट आसान शिकार मिळविण्यासाठी आल्याची प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांच्या लक्षात आली. हा बिबट्या एखाद्या व्यक्तीवर हमला करेल या भितीने गावकऱ्यांनी तातडीने वनविभागाला या बाबीची तातडीने माहिती दिली. यावरून विनाविलंब वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव व त्यांचे कर्मचारी घटना स्थळी दाखल होवून येथिल परिस्थिती जाणून घेतली. तोच हा बिबट्या जखमी असल्याचे निदर्शनास आले. त्याला जेरबंद करण्यासाठी पांढरकवडा व पुसद येथिल वनविभागाच्या पथकाला प्राचारण करण्यात आले. तोपर्यन्त गावकऱ्यांनीही तोबा गर्दी केली होती. त्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेवून प्रयत्न केले असता प्रथमच भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्या ने एका वनरक्षकावरच झडप घातली सुदैवाने ती त्याची झडप होकुन तो पऱ्हाटीच्या ढीगात पडली व तिथेच तिने जीव सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
*याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रंजीत जाधव यांना विचारले असता हा बिबट (छावा) १५ दिवसापासून जखमी असावी शिकारी दरम्यान रानटी डुक्करासोबत झटापटी झाली असावी. तिच्या पायाला गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे तिला शिकार करता येणे शक्य नव्हते ती भुकेने व्याकूळ झालेली होती ती पूर्णतः अशक्त झालेली होती. तिला सोयस्कर शिकार करता यावी म्हणून ती शेताच्या दिशेने येवून शिकार शोधत असावी. अश्यातच तिला पकडण्यासाठी आम्ही तेथे गेलो असता तिने आमच्या एका कर्मचाऱ्यावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला यात ती अयशस्वी झाली. व ती पडून मृत झाली. ती साधारण अडीच वर्षांची होती. ती मृत झाल्याने पशुधन विकास अधिकारी गोपाल ठाकूर यांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. यादरम्यान बिबट मादी असल्याचे समजले व तिच्या पायाला जखमा असल्याचे दिसून आले. यात नेमके ही बिबट्या (छावा) कश्यामुळे मृत झाली ते शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूबाबतचे कारण पुढे येईल असे सांगितले.* यावेळी घाटंजी वनपरिक्षेत्र अधिकारी रंजीत जाधव सह वनविभागाचे कर्मचारी हजर होते. या बिबट्याचे मृत्यू नेमके कशामुळे झाले याबाबत अहवालात काय पुढे येते हे ऐकण्यास परिसरातील नागरिकाना आस लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Copyright ©