———————————————–
दहा वर्षीय फिजा अंजुम चे सर्वत्र कौतुक
******************************
येथिल घाटी येथे वास्तव्यास असणारे दैनिक मतदार चे घाटंजी तालुका प्रतिनिधी कज्जुम कुरेशी यांची दहा वर्षीय मुलगी फिजा अंजुम हिने पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा पुर्ण केल्याने सर्वत्र स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दहा वर्षीय चिमुकलीने रखरखत्या उन्हात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा तिचे जिद्द आणि धाडस कमालीची असून तिच्या कुटुंबीयांनी कडून तिचे नियमानुसार रोजा इफ्तारी करण्यात आली.
पवित्र रमजान महिना हा मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानल्या जातो. या महिन्यामध्ये तिस दिवस सकाळी चार वाजता उठून पवित्र रोजाची तयारी करतात. व दिवसभर काहीही न खाता पिता सायंकाळी सातवाजेच्या सुमारास रोजा खोलून रोजा पूर्ण केला जातो. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव आपल्या दैवताची मोठ्या आस्थेने नमाज अदा करतात. प्रत्येक घरा- घरात थोर मंडळी रोजा ठेवतात. या रोजातून पोटाची भूक व पाण्याची तहान याची जाणीव प्रत्येकाला व्हावी यासाठी इस्लाममध्ये रोजे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय अनेक नियम या रोजा मध्ये नमूद असून या पवित्र महिन्याच्या दिवसामध्ये पवित्र कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन केले जाते. हा १५ तास २० मिनिटाचा रोजा नमाज तसबिह व प्रार्थना दुवा करून सर्व नियमाचे काटेकोर पालन करीत फिजा अंजुम हिने आपला पहिले रोजा पूर्ण केला आहे. यावर्षी कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव व शासनाचे निर्बंध लक्षात घेता मुस्लिम बांधव घरातूनच नमाज अदा करीत आहे. कोरोनाचे संकट दूर होवून कोरोना या संसर्ग माहामारीचा नायनाट व्हावा व जनता भितीमुक्त जिवन जगण्याची वेळ यावी या मागणीसह या पवित्र महिन्यात अल्ल्हाकडे विशेष दुआ मागण्यात येत आहे.
फिजा अंजुम चे हे जिद्द व धाडसाने चकित झालेले कुटुंबिय तिला प्रोत्साहन देत आहे. यावेळी तिचे आजी- आजोबा, आई- वडील, काका – काकू व कुरेशी परिवारातील असंख्य सदस्य हजर होते.
