Home यवतमाळ मंगरूळ कारखाना येथे भीषण अपघात 1 ठार तर 21 गंभीर

मंगरूळ कारखाना येथे भीषण अपघात 1 ठार तर 21 गंभीर

30

 

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत मंगरूळ का. येथे मध्य रात्री 2 वाजताच्या सुमारास लातुर कडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल क्र. एम एच २२ एन.३३४८ नी ट्रक क्र. एम एच २६ एडी ८३६९ ला जबर धडक दिली यात एकझन जागीच ठार झाला तर इतर २ गंभीर असल्याने नागपूर हलविण्यात आले तर १९ जखमींवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे असे एकूण २२ प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली हे सर्व मजूर छतीस गड वरुन लातूर येथे काम करण्यास जात होते मंगरूळ का. येथे उभ्या ट्रकला टेम्पो नी जबर धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला उभा असलेल्या ट्रकचे पास लाईट बंद होते टेम्पो ट्रॅव्हल चालकास ट्रक न दिसल्याने टेम्पो नी धडक दिली हा ट्रक बऱ्याच वेळचा उभा असल्याची माहिती आहे, हायवे गस्ती वाल्यांनी गस्त केली असती तर हा अपघात टळला असता हे सर्व कामगार २०,२५,३०,३५ वयोगटातील आहे यातील जखमींवर वसंतराव नाईक रुग्णालयात यवतमाळ येथे उपचार सुरू आहे वृत्त लीहे पर्यंत ओळख पटलेली नव्हती या प्रकरणी यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ढोबळे तपास करीत आहे

Copyright ©