Home यवतमाळ कृषी कायद्याची होळी किसान सभेचा एल्गार

कृषी कायद्याची होळी किसान सभेचा एल्गार

11

 

नेरपरसोपंत
अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त मोर्चाच्या देशव्यापी आवाहनानुसार दिनांक 28 मार्च 2021 रोजी होळीच्या निमित्ताने तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी या कायद्याची होळी करण्याचे आयोजन करण्यात आले, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन सुविधा कायदा 2020. आणि
शेतकरी सशक्तिकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा कायदा 2020. तसेच जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020.
हे तीनही कायदे भारतीय शेतकऱ्यांना तसेच सामान्य जनतेला उध्वस्त करणारे कायदे आहेत.
हे तीनही कायदे देशातील श्रीमंत, धनिक भांडवलदार वर्गाच्या कल्याणासाठी आणि शेतकरी सामान्य जनतेला उध्वस्त करण्यासाठी केंद्र शासनाने पारित केलेले आहेत. या तीन कायद्याला रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतीमालाला हमीभावाचा कायदा करण्यात यावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या चार महिन्यापासून शेतकरी ठाण मांडून धरणे आंदोलन करीत आहेत. या तीनही कायद्याची होळी करण्यात आली. किसान सभेचे जिल्हा सचिव गुलाबराव उमरतकर, जमीर बेग मिर्झा, प्रवीण कोटेकर,पंकज उमरतकर यांची उपस्थिती होती.

Copyright ©