Home यवतमाळ लाडखेड पोलीस स्टेशन तर्फे बोरिअरब ग्रामपंचायत येथे होळीनिमित्त शांतता मीटिंग पार पडली

लाडखेड पोलीस स्टेशन तर्फे बोरिअरब ग्रामपंचायत येथे होळीनिमित्त शांतता मीटिंग पार पडली

11

पोलिस उपनिरीक्षक ढोके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बोरिअरब येथे होळी व धुलीवंदनाच्या निमित्त शांतता मीटिंग आयोजित केली होती , या प्रसंगी ढोके साहेब यांनी सर्वांना आवश्यक सूचना दिल्या. सार्वजनिक ठिकाणी होळी निमित्य 5 पेक्षा अधिक लोक जमणार नाही आपाआपल्या घरीच होळी पेटवून साजरी करावी .कोरोनाचा वाढता प्रसार बघता धुलीवंदनाच्या दिवशी एकमेकांना रंग लावू नये समजा एखाद्या कोरोना रुग्णाने दुसऱ्या व्यक्तीला रंग लावल्यास त्याचा प्रसार होतो म्हणून रंगपंचमीच्या उत्सवावर पूर्णपणे निर्बंध असून कुणीही रंग लावू नये डी.जे. साऊंड वर पूर्णपणे बंदी असून कुणीही लावल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल .या प्रसंगी उपसरपंच ओमबाबू लढढा, पोलिस पाटील हरिकाका ठाकरे, शंकरराव चव्हाण, रणजित काकडे, संजय नागपुरे, संतोष बोरकर,अजय रुंदे, प्रकाश खंडारे, एजाज काजी, बाबाराव निंबरते ,गोवर्धन दादा भीमजियानी उपस्थिती होते.

Copyright ©