सोमवार, दि. २२ मार्चला एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे स्वास्तिक पाईप इंडस्ट्रीज जुनी एम.आय.डी.सी. लोहारा येथे मोफत कोविड १९ ची ठढझउठ चाचणी करण्यात आली. पाहणीसाठी कुणाल झालटे तहसीलदार यवतमाळ, डॉ. विजय अग्रवाल नगर परिषद, यांनी पाहणी केली सकाळी ९ वाजतापासून २ पर्यंत ५०० उद्योजक व कर्मचारी वर्ग यांची चाचणी घेण्यात आली. या उपक्रमासाठी एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष नंदकुमार सुराणा, सचीव आनंद एस भुसारी, सहसचीव जितेश पतीरा, उपाध्यक्ष शाम qसधी, सहसचीव अमीन कारानी, अरुण रामपूरकर, राज अग्रवाल, जय चव्हाण, संदीप तातेड, अतुल मागूळकर, सुरेश जाधव, राहुल पतीरा, सुनील जैन, विक्रम खियानी व सर्व उधोजकं, पदाधिकारी सदस्य यांनी या उपक्रमाला सहकार्य लाभले.
