Home यवतमाळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच शासनाने केलेले खून- शेतकरी नेते अमर हबीब

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हेच शासनाने केलेले खून- शेतकरी नेते अमर हबीब

12

महागाव: साहेबराव करपे कुटुंबियांच्या ३५ व्या स्मृतिदिना निमित्त किसानपुत्रांनी चिलगव्हाण येथे दिवसभर उपवास करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्याना मशाल पेटवून श्रद्धांजली अर्पण केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी व तमाम शेतकऱयांना नरभक्षी शेतकरीविरोधी कायद्याच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ही संस्था कार्य करेल. अशी घोषणा किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने चिलगव्हाण येथे उपोषणाच्या समारोप कार्यक्रमात करण्यात आली. या संस्थेच्या वतीने सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साहेबराव करपे कुटुंबियांचे गाव चिलगव्हाण येथे स्मारक उभे राहावे यासाठी किसानपुत्र आंदोलन सर्व शक्तीनिशी सहकार्य करेल.शेतकरी आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या बद्दल किसानपुत्र आंदोलनाने चिंता व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे सांगून शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही असा आरोप केला.

नरभक्षी कायदे रद्द करा

तीन नव्या कृषी कायद्याना किसानपुत्र आंदोलनाचा विरोध नाही पण सीलिंग, आवश्यक वस्तू, हे जीवघेणे कायदे समूळ रद्द करणे जास्त गरजेचे आहे असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी दीपक नारे, बंडू जिगरोल, संतोष अरसोड, गोपाळ पाटील, ऍड सुभाष खंडागळे, संदीप जाधव, शिवाजी गावंडे, विजय वाकडे, आमदार नामदेव ससाणे, डॉ विजय मोरे, अशोक वानखडे सह आदी उपस्थित होते.

पदयात्रा-औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी 125 किमीची पदयात्रा करण्याचा निर्धार डॉ राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला होता. त्या नुसार’शेतकरी सहवेदना यात्रा’ 11 मार्च रोजी औंढा नागनाथ येथून निघाली व 19 मार्च रोजी चिलगव्हाण येथे पोहचली.नऊ दिवसांच्या या पदयात्रेत अनेक  गावाना भेटी दिल्या.औंढा नागनाथला सुरुवात करून येहळेगाव करीत दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, या मार्गाने ही पदयात्रा 19 मार्च रोजी चिलगव्हाणला पोहचली.

Copyright ©