Home यवतमाळ प्रशासनाने वृत्तपत्र विक्रेत्यावर अधिकार थापू नये अन्यथा यांच्या वाईट परिणामाला सामोर जावे...

प्रशासनाने वृत्तपत्र विक्रेत्यावर अधिकार थापू नये अन्यथा यांच्या वाईट परिणामाला सामोर जावे लागेल:-जिल्हा अधक्ष ओंकार चेकें

10

 

आज रविवार (१४ मार्च) रोजी वाचक पेपर वाचण्यापासुन वंचित

सविस्तर वृत्त असे की,
शनिवार (१४मार्च) ला नगर पालिका प्रशासनाच्या वतीने संपुर्ण शहरात नोटीस धडकल्या की, शहरातील पानटपरी , फळ विक्रेते, वृत्तपत्र वितरक ,यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली. यामध्ये जर कोणी चाचणीला टाळाटाळ केली तर त्या वितरकाचा व्यवसाय बंद करण्यात येईल अशी एकटप्पी भुमिका पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. त्यामुळे संपुर्ण वृत्तपत्र वितरकांनी नगर परिषदेच्या एकटप्पी भुमिकेचा निषेध म्हणून वितरणावर निषेध दर्शविला आहे. त्यामुळे आज वणीकरांना वृत्तपत्र वाचण्यापासुन वंचित रहावे लागणार आहे. पालिका प्रशासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांवर आपला अधिकार थापू नये अन्यथा परिणा मास सामोरे जावे लागेल असा इशाराही स्व. पी एल शिरसाट प्रणित महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके यांनी दिला आहे देशाच्या चवथ्या आधारस्तंभां छेडू न का वृत पत्र हे महत्वाचे घटक असून देशातील सर्व घडामोडी तुमच्या पर्यंत पोहचवायचे काम करते आणि त्यावरच अंकुश लावायचा प्रयत्न करणे योग्य नाही याच्या वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल

Copyright ©