वाढोना (बाजार) प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यार आला असल्याने अनेकांचे धाबे दणाणले
प्रथमच यवतमाळ जिल्ह्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे . यामुळे प्रशासनाची झोप उडाली तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कुचकामी दिसत असल्याचे चित्र आहे . यवतमाळ जिल्ह्यात बालकांना पोलियो डोज देण्या ऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्या जाते या वरून आरोग्य विभाग सर्वसामान्याच्या जीवाशी खेळत आहे अशा अनेक प्रकरणाने यवतमाळ आरोग्य यंत्रणेचे अक्षरश: संपूर्ण देशात धिंडवडे निघाले . आपली जिल्हा परिषद यंत्रणा खरोखरच जागरूक आहे का हे बघण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार यांनी काल राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली . यावेळी एक संतापजनक प्रकार उघकीस आला .या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह सर्व वैद्यकीय कर्मचारी गैरहजर होते . यामुळे कालिंदा पवार यानि त्यावर नाराजी व्यक्त केली सर्व आरोग्य या वेळी कर्मच्याऱ्याना पाचारण करण्यात आले . संतापलेल्या कालिंदाताई पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वांचाच खरपूससमाचार घेतला . यावेळी या आरोग्य केंद्रावरील अनेक तृट्या समोर आल्या या आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकार्यास यवतमाळ येथे सुनावणीस बोलाविले असून कठोर कारवाईचे संकेत यावेळी त्यांनी दिले असाच प्रकार संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून याला जवाबदार जिल्हा आरोग्य अधिकारी असल्याचे अनेकाकडून बोलल्या जात आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जागेवर येईल का असा सवाल सर्व सामाण्यान कडून करण्यात येत आहे.
सौ कालिंदाताई पवार- जिल्हा परिषद अध्यक्षा यवतमाळ
दि २५ फेब्रुवारी रोजी मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद वाढोना बाजार येथे ५.४५ ला येथे भेट दिली असता आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हते.नंतर डॉ ठाकरे म्हणून आले,मग डॉ कुडमते म्हणून आले.ते सुद्धा लेटलतीफ पोहचले.त्यांना कर्मचारी बद्दल विचारणा केली असता ते म्हणाले मी मिटिंग घेऊन कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली.त्यानंतर सगळे १० मी आरोग्य केंद्रात हजर झाले. वाढोना बाजार आरोग्य केंद्राचा जो कारभार जो परिसर आहे तो अगदी न पाहालेलाच बरा त्या ठिकाणी मला निर्देशनात आलं.मी तिथल्या सर्व फाईल्स (कागदपत्रे) बघितल्या जे रुग्णसमिती स्थापन आहे त्यात समित्यांचे नाव नव्हते,त्यातून अध्यक्ष पद हे काढल्या गेलं आहे.स्वतःहून दुसरी समिती स्थापन केल्याचे आढळले.बोर्डवर नाव वेगळे फाईल्सवर नाव वेगळे असे निर्देशनात आले.मला समाधानकारक त्याठिकाणी अस काही आढळलं नाही.जेव्हा रुग्ण आले तेव्हा आरोग्य केंद्रात कोणीच हजर नव्हते,एखादे वेळी आपतकालीन रुग्ण आला तर त्यांनी काय करायचं, आपण आरोग्य केंद,उपकेंद्र का उभारतो,गोर गरिबांच्या सेवेसाठी उभारतो,त्यांना सुद्धा सुविधा मिळावी यासाठी परंतु,जर तेथील डॉक्टरच नसेल तर रुग्णांनी काय करायचं असा गंभीरप्रश्न आहे.आपतकालीन रुग्ण असला की रुग्णवाहिका त्याठिकाणी मिळत नाही,मग रुग्णवाहिकेचा काय उपयोग सीसीटीव्ही कॅमेऱ्या बाबत विचारणा केली असता ते चालू असल्याचे सांगितले, प्रत्यक्षात मात्र पाहणी केली तर बंद अवस्थेत आढलेआहे.हा संपूर्ण प्रकार लाजिरवाणा दिसुन आला आहे.त्या ठिकाणी समाधानकारक काहीच वाटलं नाही.मी सुनावणी ठेवली आहे,त्या सुनावणी मध्ये मला तेथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर त्यांनी आपलं मत व्यक्त करावं यावर योग्य निर्णय नक्कीच घेईल असे कालिंदाताई यांनी वेक्त केले
प्रतिक्रिया 2
सौ प्रीतिताई संजय काकडे
जिल्हा परिषद सदस्य वडकी या प्रकरणी अध्यक्षा कडे वारंवार पाठ पुरावा केल्यानं ताईंनी स्वत: दखल घेत पाहणी केली आणि सत्य समोर आले दोषींवर कार्यवाई होणारच असे त्यांनी सांगितले.
