युवा नेतृत्व मंगेश पाचभाई यांच्या गटाने केली दिग्गजांनवर मात
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेली अडेगाव ग्रामपंचायतीवर अखेर एका , होतकरू, रक्तदुत मंगेश पाचभाई यांच्या गटाचा विजय झाला असुन , ईश्वर चिठ्ठिच्या माध्यमातून हा विजय घोषित करण्यात आला.
यामध्ये पाचभाई गटाचे सिमा लालसरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली असुन ,उपसरपंच म्हणून भाजप गटाचे भास्कर सुर हे निवडुन आले आहे. आज झालेल्या सरपंच पदाच्या दावेदारी साठी ,मोठ मोठ्या दिग्गजांनी आपली शक्ती पणाला लावली होती. परंतु निरंतर केलेल्या समाज कार्याला जनतेचा कौल मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हे पाचभाई यांच्या गटाने सिध्द करून दाखवले. मंगेश पाचभाई गट आणी भाजपने मिळुन आठ जागेवर विजय संपादन केला होता. परंतु सरपंच पदाच्या चुरशीमध्ये दोन्ही गट वेग वेगळे झाले.
आणी अडेगाव ग्रामपंचायतीवर संपुर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले होते..
या चुरशीच्या झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगेश पाचभाई गटांच्या सिमा दत्तात्रय लालसरे यांना ईश्वर चिठ्ठीचा कौल मिळुन सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
या संपूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत, दिग्गजांनवर मात करुन आपल्या सामाजिक कार्याने सर्व काही शक्य करता येते . असे यावेळी बघायला मिळाले.
