Home यवतमाळ महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे दिग्रस ता.उपाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे यांची झिरपूरवाडी ग्रामपंचायत च्या...

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे दिग्रस ता.उपाध्यक्ष पुरुषोत्तम कुडवे यांची झिरपूरवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी व उपसरपंच पदी बाबाराव पवार यांची बिनविरोध निवड

8

 

तालुक्यातील झीरपूरवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी पुरुषोत्तम श्रीराम कुडवे तर उपसरपंच पदी बाबाराव झिताजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५जानेवारीला संपन्न झाल्या असून १८ फेब्रुवारी ला झिरपवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. यात सरपंच पदासाठी पुरुषोत्तम श्रीराम कुडवे, तर उपसरपंच पदासाठी बाबाराव झीताजी पवार यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होऊन निवड करण्यात आली. ग्राम विकास आघाडी पॅनलने सात पैकी सात जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. १८ तारखेला झालेल्या सरपंच उपसरपंच या निवडणुकीत सरपंचपदी पुरुषोत्तम कुडवे उपसरपंचपदी बाबाराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सभेला सदस्य गण सुनील नामदेव भस्मे,मिरा विलास डहाणे, अरुणा शंकर जुडे, सुनिता नामदेव पवार, सविता भिमराव डहाणे, उपस्थित होते.निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून जी .बी. परांडे प्रशासक गजानन खरबडे यांनी काम पाहिले निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सिताराम झळके, पंडित मिरासे, किसन भस्मे, प्रकाश पवार, वामन जुडे, नामदेव पवार, दीपक भस्मे, सुधाकर रणमले , संतोष कुडवे, रमेश म्हस्के चंपत डहाणे, सुभाष शेळके, हिम्मत डहाणे, पांडुरंग पवार, बबन नाटकर, गजानन पवार, पांडुरंग बोडखे इत्यादी मोलाचे सहकार्य केले

Copyright ©