Home यवतमाळ *घाटंजी येथे रोगनिदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* ___ *विनोबा भावे...

*घाटंजी येथे रोगनिदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* ___ *विनोबा भावे रुग्णालय व संत सेवालाल महाराज उत्सव समितीचे आयोजन*

9

 

 

घाटंजी : १७

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व रोगनिदान व उपचार शिबीर तसेच फाटलेले ओठ व टाळू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. दीर्घ आजार असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे नेण्यात येणार आहे.

 

सुमारे ५० रुग्णांची डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवि हेमंतकुमार कांबळे,प्रा.विठ्ठल आडे,संजय डभारे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कोरोनामुळे ग्रामीण भागातील अनेकांना आपल्या आजाराची योग्य तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना या शिबिराचा मोठा फायदा झाला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

 

शिबिराच्या आयोजनासाठी अरविंद जाधव, बंडू जाधव, सुनील जाधव, रवी आडे, गणेश राठोड, राजू चव्हाण, आकाश राठोड, राहुल आडे, संदीप जाधव, कैलास पवार, विजय राठोड, धनराज पवार,साहेबराव पवार यांनी पुढाकार घेतला.

Copyright ©