Home यवतमाळ यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष यांची आर्णी पंचायत समितीस आकस्मिक भेट

यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष यांची आर्णी पंचायत समितीस आकस्मिक भेट

18

 

कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
आर्णी / आज दुपारी ४ वाजता आर्णी पंचायत समिती येथे जिल्हा परिषद यवतमाळ अध्यक्ष सौ.कालंदा ताई पवार,शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड,समाजकल्याण सभापती श्री विजय राठोड,महिला व बालकल्याण सभापती जयश्री ताई पोटे,जिल्हा परिषद सदस्य सौ.स्वाती ताई ऐंडे,श्री यशवंतभाऊ पवार यांच्या चमू ने अचानक भेट दिली.या वेळी पंचायत समिती आर्णी येथिल अधिकारी व कर्मचारी भांभाऊन गेले.
काही कर्मचारी गैरहजर आढळून आले तसेच स्वच्छतेचा अभाव दिसून आल्याने अध्यक्ष मोहदय यांनि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले कोरोना काळात स्वच्छतेसाठी अधिक उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या
या नंतर संपूर्ण चमूने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णी येथे आकस्मिक भेट देऊन
अधिकाऱ्यांची झडाझडती घेतली आर्णी तालुक्यात होत असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला गुणवत्ता पूर्वक कामे करून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना या वेळी करण्यात आल्या.

Copyright ©