जिद्द, मेहनत, चिकाटी हे गुण अंगात असले की मनुष्याच्या जीवनात कितीही चढ-उतार आले की त्या संकटावर मात करू शकतो. अशाच परिस्थितीतून समोर आलेल्या व कोरोना काळात सेवा देत असलेल्या यवतमाळ येथील बी. वि. जी.१०८ चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. वैभव देउलकर, सुपरवायझर गौरव इंगोले, जनार्दन धोंगले व चालक निलकंठ आडे या कोरोना योद्धाचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुशर वारे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अनेक दिवसापासून या काळात त्यांनी यवतमाळ येथे कोरोना योद्धा म्हणून या पदावर उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या कायार्तून कोरोना संकटांमध्ये अनेकांना मदत मिळाली. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यांनी आपल्या यशाचे श्रेय वरिष्ठ अधिकारी व कोरोना गावाचे नाव लौकिक केले आहे.
