Home यवतमाळ *घाटंजी येथे जोगेंद्रनाथ मंडल यांची जयंती*

*घाटंजी येथे जोगेंद्रनाथ मंडल यांची जयंती*

11

 

 

घाटँजी:३१

घाटंजी जय भीम चौक येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोगेंद्रनाथ मंडल यांची जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुनील नगराळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान समितीत जाण्याचा मार्ग बंद झाल्या नंतर त्यांना निवडून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न जोगेंद्रनाथ मंडल यांनी केला,जर त्या वेळेस त्यानीं हे योगदान दिले नसते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्या समितीत पोहचू शकले नसते े,असे मत व्यक्त केले,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.टी. वाढवे यांनी जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये 29 जानेवारी 1904 मध्ये झाला,त्यांनी मागास प्रवर्गासाठी सतत कार्य करून त्यांच्या उत्थाना साठी कार्य केले.असे मत व्यक्त केले,या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीे दादाराव खोब्रागडे,माजी सभापती,न.प.घाटंजी,अजय गजभिये हे होते,या कार्यक्रमाच्या वेळी राहुल वाळकेे,मनोज रामटेके,प्रतीक पाटील,सचिन रामटेके दुधनाथ गजभिये,संजय घुसे,सूर्यकांत ढोके,प्रवीण मेश्राम,गणेश लोहकरे,दीपक देवतळेे ,अमोल पाटील या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे आयोजन संतोष ओंकार,शुभम नगराळे यांनी केले,कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र मुनेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन उमेश घरडे यांनी केले.

Copyright ©