नेमाडे यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी
घाटंजी:- बंजारा समाजातील विविध संघटनेच्या वतीने लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या आक्षेपार्ह लिखाना विरोधात तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
लेखक,भालचंद्र वनाजी नेमाडे यांनी लिहलेल्या “हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ” या कादंबरीत बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लिखाण हे जाणीवपूर्वक केल्याबद्दल या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे व प्रकाशक, हर्ष भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई या दोघांवर शासनातर्फे गुन्हा दाखल करून या कादंबरीच्या विक्रीवर निर्बंध आनावे व लेखकाला मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
कादंबरीमध्ये स्त्रियांविषयी अत्यंत अश्लील व विभत्स स्वरूपाचे लेखन करून भारतातील जवळपास बारा कोटी बंजारा समाजाच्या भावना दुखविण्याचे पातक लेखकाने केल्याचे निवेदनात नमूद आहे.नेमाडे यांनी आक्षेपार्ह लिखाण केलेल्या अपूर्ण कादंबरीच्या पहिल्याच खंडाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला असून या कादंबरीतून समस्त बंजारा समाजाच्या स्रियाबद्ल नामुष्कीचे लिखाण करून स्वाभिमानी समाजाच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे.त्यामुळे समाजाकडून कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडण्यापूर्वी तात्काळ लेखक व कादंबरीच्या प्रकाशकाला अटक करून, या कादंबरीला चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेऊन कादंबरीच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी समाजाकडून होत आहे.
याप्रसंगी,भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था, राष्ट्रीय बंजारा टायगर्स,ऑल इंडिया बंजारा सेवा संघ,गोर सेना,राष्ट्रीय बंजारा परिषद,इत्यादी संघटनेचे नामदेवराव आडे,सुधाकर राठोड,वामन राठोड,अरविंद जाधव,रवि आडे,कैलास राठोड,गणेश राठोड,सुनील जाधव,बंडू जाधव,राजू चव्हाण,संजय आडे,विजय राठोड,सुरेश पवार,संदीप जाधव,सचिन राठोड,संजय जाधव सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
