गोरेगाव येथे इफ्तार चे आयोजन :
रोजा म्हणजे संयमाचे प्रतीक : वसुदेव पंचाळ सरसाखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गोरेगाव येथे सरपंच वसुदेव पंचाळ यांच्या वतीने दरवर्षी मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यात इफ्तार चे आयोजन केल्या जाते ज्यात गावातील सर्वच मुस्लिम बांधव रोजेदार उपस्थित राहतात. याहीवर्षी २७ व्या रोजानिमित्त इफ्तार चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६:३० वाजता मुस्लिम समाज मंदिरात गावातील रोजेदार मुस्लिम बांधवांनी पेंडखजूर, फळ आणि अल्पउपहाराचे सेवन करुन उपवास सोडला. यावेळी वैभव भागवत पंचाळ, दिलशादखान पठाण, सैय्यद राजू सर, इमरानखान पठाण, जावेदखान पठाण, इफ्तेखारखान सर, अनीसखान, रईसखान, अक्रम आलमखान, पप्पू पठाण, बदरखान, समीरखान आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रोजा म्हणजे संयमाचे प्रतीक असल्याची भावना पंचाळ सर यांनी व्यक्त करुन सर्वच रोजेदार यांचे आभार मानले.




