Home Breaking News साखरखेर्डा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

साखरखेर्डा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

33

साखरखेर्डा येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती महोत्सव साखरखेर्डा येथे शिवरायांच्या जयघोषात ढोल ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरीतील तसेच परिसरातील युवक, लहान – थोर, स्त्री-पुरूष मोठ्या संख्येने सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाले होते. मुख्य कार्यक्रम येथील मेहकर टी पॉईंट चौकात झाला. येथील मेहकर टी पॉईंट वर एक स्टेज उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत स्थापना करण्यात आली होती. सकाळी ७ वा. पासूनच नागरिकांनी टी पॉईंट वर हजर राहून शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून मनोभावे वंदन केले. विशेषतः बाळ गोपाळांनीही जयंती सोहळ्यात हजेरी लावून शिवरायांचे पूजन करून मनोभावे वंदन केले.
“जय भवानी जय शिवराय” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थित सर्वच शिवभक्तांचे भगवी शिवटोपी व भगवा रूमाल देऊन सन्मानित करण्यात आले. काही शालेय विद्यार्थी व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. सुधाकर पऱ्हाड यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची स्थापना करून सर्वधर्मसमभाव जपत राज्यकारभाराबाबत सविस्तर विवेचन केले.
सकाळी १० वा. चे सुमारास सामूहिक जिजाऊ वंदना घेऊन महाराजांना अभिवादन करण्यात. आले. याप्रसंगी शिवभक्तांची मोठी रीघ लागली होती. गावातील गणमान्य मान्यवरांसह विविध पक्षांचे, विविध जाती धर्माच्या नागरिकांनी या सोहळ्यात उस्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेनेचे श्रीनिवास खेडेकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवश्री सुधाकर पऱ्हाड, सरपंच सौ.ज्योती सचिन जाधव, कार्याध्यक्ष सुनील बबनराव रिंढे, कोषाध्यक्ष अरूण देशमुख, माजी सरपंच कमलाकर गवई, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी तथा प्रल्हाद महाराज संस्थानचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे, माजी सभापती राजू ठोके, शिवसेनेचे महेंद्र पाटील, भाजप युवा नेते अंकूर देशपांडे, माजी सरपंच पूनमताई महेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ स्नेहल रविंद्र पाटील, ठाणेदार गजानन करेवाड, रामदाससिंग राजपूत, जीवनसिंग राजपूत, उद्योजक गीताराम तायडे, चिखली अर्बन बँकेचे संचालक अशोकराव पाटील, सुनील जगताप, दिलीप बेंडमाळी, ललित अग्रवाल, डॉ.ज्ञानेश्वर तांगडे, राजू काटे, ईश्वर पऱ्हाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील रिंढे, यश पवार, संजू काटे, रवि पऱ्हाड, कैलास पऱ्हाड, प्रतीक तायडे, सोनू पवार, पवन जाधव, विलास रिंढे, कुणाल सुस्ते, राहूल काटे, जयेश काळे, गोपाल जायभाये, बबलू पवार श्रीकांत पऱ्हाड, बंडू पऱ्हाड आदींनी अथक परिश्रम घेतले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोउनि गणेशराव डोईफोडे, पोहेकॉ. रामदास वैराळ सह ईतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Copyright ©