Home Breaking News वाहनावरील ताबा सुटल्याने समृद्धी महामार्गावर अपघात : पाच जण जखमी

वाहनावरील ताबा सुटल्याने समृद्धी महामार्गावर अपघात : पाच जण जखमी

41

वाहनावरील ताबा सुटल्याने समृद्धी महामार्गावर अपघात : पाच जण जखमी

🔸गुलशेर शेख🔸

दुसरबीड : (दि. २ फेब्रुवारी) समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक 309.4 वर आज दुपारी 2:20 दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की चैनल नंबर 309.4 मुंबई कॅरिडोर वर वाहन क्रमांक एमएच 01 बीयु 99 95 चालक नावे उद्धव लाडेवार (वय 40 वर्ष) यांचे वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला असून यात विजया निमवाड , देवांश लाडेवार, वेदांत लाडेवार, गंगासागर लाडेवार, व उद्धव लाडेवार जखमी झाले आहेत. गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून जखमींना 108 रुग्णवाहिका चालक सुभाष पांचाळ व प्रदीप पडघान, डॉक्टर अशोक पिसे व मंगेश काळे यांनी मेहकर येथे सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती केले. अपघातग्रस्त वाहन हे रोडच्या बाजूला करून बॅरिकेटिंग करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच एपीआय इंगळे सोबत एएसआय खडसे एमएसएफ चे दोन जवान घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांच्या गाडीत डिझेल नसल्याने अपघातस्थळी  पोलीसही ॲम्बुलन्सनेच दाखल

समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघात घडतात. मदतकार्यासाठी पोलीस प्रशासन तातडीने हजर होत असतो व ॲम्बुलन्सही लगेच घटनास्थळी दाखल होत असते मात्र गाडीत डिझेल नसल्याचे सांगत पोलीस प्रशासन चक्क ॲम्बुलन्सने अपघातस्थळी पोहोचले असल्याची चर्चा उपस्थिताध्ये सुरू होती.

Copyright ©