Home Breaking News माजी सरपंच रामदास पंचाळ उर्फ सावकार यांचे दुःखद निधन

माजी सरपंच रामदास पंचाळ उर्फ सावकार यांचे दुःखद निधन

23
Oplus_131072

माजी सरपंच रामदास पंचाळ उर्फ सावकार यांचे दुःखद निधन

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गोरेगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच रामदास पंचाळ उर्फ सावकार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्ष होते. ग्रामपंचायत मध्ये सतत ८ वेळा निवडून आलेल्या सावकार यांनी १० वर्षे सरपंचपद ही भूषविलेले आहेत तसेच आजरोजी त्यांच्या पत्नी श्रीमती सिंधूबाई पंचाळ ह्या विद्यमान सरपंच आहेत. गावाच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध असलेले रामदास पंचाळ हे गावातली एक “चलती-फिरती बँक” अशीच त्यांची ओळख होती. कुणाच्याही सुख-दुःखात धावून जाऊन मदत करण्याच्या स्वभावामुळे ते गावात विशेष लोकप्रिय होते. सुमारे १०० एकर शेतीचे धनी असलेल्या अशा एका सधन कास्तकार असलेल्या “सावकार” यांच्या अकाली दुःखद निधनाने गावातच नव्हे तर पंचक्रोशीत शोककळा पसरली असून त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ, तीन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे.

Copyright ©